शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

३१ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

By admin | Updated: June 26, 2015 02:14 IST

राज्य निवडणूक आयोगाने ३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व ४२ ग्रा.पं. च्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

वर्धा : राज्य निवडणूक आयोगाने ३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व ४२ ग्रा.पं. च्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २५ जुलै रोजी यासाठी मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिली. ग्रा.पं. च्या सार्वत्रिक निवडणुका व ४२ ग्रा.पं. च्या पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात मतदान घेण्यात येत असल्याने संबंधित ग्रा.पं. च्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता सोमवार दिनांक २७ जुलै रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहनही अप्पर जिल्हाधिकारी भागवत यांनी केले. वर्धा तालुक्यात सार्वत्रिक साटोणा तर पोटनिवडणूक कुटकी, चिकणी, पुजई, आष्टा, इंझापूर येथे आहे. सेलू तालुक्यात चारमंडळ, हिंगणी, येळाकेळी येथे सार्वत्रिक तर आलगाव, बोंडसुला, आमगाव (ख.), बाभुळगाव, सोंडी, सुकळी (स्टे.), वडगाव (क़) येथे पोटनिवडणूक होईल. देवळी तालुक्यात आकोली, कवठा (रेल्वे), बोरगाव (आ.) येथे सार्वत्रिक तर रोहणी, सोनोरा (ढोक), बाभुळगाव (बो.), सावंगी (येंडे), खातखेडा, लक्ष्मीनारायणपूर, जामणी येथे पोटनिवडणूक आहे. हिंगणघाट तालुक्यात कापसी, हिवरा येथे पोटनिवडणूक, समुद्रपूर तालुक्यात मोहगाव, चिखली, करूर, नारायणपूर, सावंगी (झा.), कोरा, मंगरूळ, हळदगाव, सुजातपूर, हिवरा येथे सार्वत्रिक निवडणूक आहे. आर्वी तालुक्यात हिवरा, बेल्हारा, बोथली, किन्हाळा, वर्धमनेरी, रोहणा, धनोडी (बहा.), बेनोडा येथे सार्वत्रिक व बेढोणा, सावंगी, पानवाडी, काचनूर, आजनगाव, पिंपळगाव (भो.), बोथली (न.), इठलापूर, अहिरवाडा, हुसेनपूर, वाई येथे पोटनिवडणूक आहे. आष्टी येथे पोरगव्हाण, अंतोरा येथे सार्वत्रिक तर खडका, चिस्तूर येथे पोटनिवडणूक होईल. कारंजा तालक्यात पारडी, कन्नमवारग्राम, आजनडोह, नरसिंगपूर, जऊरवाडा येथे सार्वत्रिक तर पालोरा, माळेगाव (काळी), दानापूर, सिंदीविहिरी, खैरवाडा, काजळी, मेटहिरजी, बेलगाव येथे पोटनिवडणूक होणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी)