रूपेश मस्के कारंजा (घा़)गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे़ यामुळेच शासनाने २०१२-१३ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे; पण काम वाटप योग्यरित्या केलेले नाही़ यामुळे २०१५ उजाडला असताना शासकीय मदतीचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही़ अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींची दुरूस्ती शासन करून देत आहे; पण त्याचे नियोजन न केल्याने तालुक्यात २३६ विहिरी अद्याप दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत़अतिवृष्टी, ओला व कोरडा दुष्काळ असे एक ना अनेक आसमानी संकट शेतकऱ्यांवर ओढवत आहे पाहिजे तेव्हा पाऊस शेतकऱ्यांना हुलकावनी देतो आणि गरज नसताना कोपल्यागत कोसळतो़ गत चार वर्षांत अतिवृष्टीमुळे जुन्या खचलेल्या विहरींची संख्या वाढली़ शासनाने २०१२-२०१३ वर्षात खचलेल्या विहरींचे पंचनामे करून विहरी दुरुस्तीचे लक्ष ठेवले होते़ सदर योजनेंतर्गत कृषी सहायक व तलाठी यांनी पंचनामे करून सदर अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवायचा होता़ यात बरीच तफावत असून पात्र डावलून अपात्र शेतकऱ्यांच्या शेताचे पंचमाने केले जात असल्याची ओरड होत आहे़ प्राथमिक पंचनामे करून ग्रामसभेत पात्र-अपात्र शेतकरी निश्चित करायचे होते़ याची माहिती ग्रामस्थांना द्यावयाची होती; पण तसे झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला़ या योजनेतून अनेक गरजुंना वगळले गेले तर ज्यांच्या विहिरी सुस्थितीत आहे, अशांची निवड झाल्याचे शेतकरी सांगतात़ बिहाडी येथील शेतकरी महादेव रेवतकर यांची विहीर खचली आहे; पण त्या विहिरीचा पंचनामाच झाला नाही़ यामुळे ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत़ तालुक्यात अशी अनेक प्रकरणे आहेत़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत गरजू लाभार्थ्यांची निवड करावी आणि विहीर दुरूस्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे़
२३६ विहिरींना दुरूस्तीची प्रतीक्षा
By admin | Updated: March 12, 2015 01:37 IST