शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

२१७ गावांत जलसंधारण

By admin | Updated: January 27, 2015 23:36 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार अभियान : टंचाईवर कायम मात करण्याचे उद्दिष्टवर्धा : पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यातील २१७ गावांत राबविले जात आहे़ पालोती येथील नाला खोलीकरण या प्रत्यक्ष कामाने हा उपक्रम सुरू झाला़ यात ४४ लाख रुपयांत जलस्त्रोतांचे बळकटीकरण केले जाणार आहे़सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाला. यावेळी आ़ पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, जि़प़ सदस्य मीरा वाळके, विरेंद्र रणनवरे, सरपंच ज्योत्स्ना वर्धने, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जि़प़ उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार आदी उपस्थित होते.पिण्याच्या पाण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे सांगताना खा़ तडस यांनी शेतकऱ्यांनी निसर्गावर अवलंबून न राहता जलसंधारणाच्या उपक्रमात सहभागी होऊन वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. आ़ भोयर यांनी जिल्हा पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी गावातील पाण्याचे नियोजन करून गरजेनुसार पाण्याचा वापर केल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पालोती येथे ८६५ टीसीएम पाण्याची मागणी असताना केवळ ३५० टीसीएम पाणी उपलब्ध आहे. नाला खोलीकरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे़ यामुळे शेतकऱ्यांनीही आपला सहभाग द्यावा, असेही त्यांनी सांगितले.पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देता यावे, यासाठी जलयुक्त शिवार हा कार्यक्रम प्रत्येक गावात राबविण्याची गरज जिल्हाधिकारी सोना यांनी व्यक्त केली़ मार्च २०१६ अखरेपर्यंत २१७ गावांत हा उपक्रम राबवायचा आहे़ ५३ गावांमध्ये जलस्त्रोत बळकटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. हा उपक्रम केवळ शासनाचा नसून जनतेनेही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी वाळके, उपसरपंच रवी राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी स्वागत करून जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)