शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
2
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
3
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
4
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
5
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
6
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
7
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
8
Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव
9
१२ वर्षांखालील मुलांना देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नैराश्य, लठ्ठपणाचा मोठा धोका!
10
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
11
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
12
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
13
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
14
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
15
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
16
डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
17
IND vs SA 2nd ODI Live Streaming: टीम इंडियानं सलग २० व्या वनडेत गमावला टॉस! मॅचसह मालिका जिंकणार?
18
देशात घुसखोरांच्या स्वागतासाठी लाल गालीचा अंथरणे योग्य आहे का?, सुप्रीम  कोर्टाने विचारला सवाल
19
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: तीन वर्षांपासून आमचे संबंध नाही; अनंत गर्जेच्या प्रेयसीने पोलिसांना काय सांगितले?
Daily Top 2Weekly Top 5

१६ व्या शतकातील किल्ल्याची झाली पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची  आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. ते चारही प्रवेशद्वार गाव सीमेवर होते. त्यापैकी तीन प्रवेश द्वार दुर्लक्षी धोरणामुळे जमीनदोस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : पत्नीसह राजाने किल्ल्यावरून घेतली होती नदीत उडी

    लाेकमत न्यूज नेटवर्कपवनार : पवन राजाच्या काळात वर्धा जिल्ह्यातील काही भागात काही वास्तू बांधण्यात आल्या. त्यापैकी एक पवनार येथील किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती सोळाव्या शतकात करण्यात आली होती. पण सध्या त्याच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासीक धरोहराचे संगोपन करण्यासाठी शासन स्थरावर योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची  आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. ते चारही प्रवेशद्वार गाव सीमेवर होते. त्यापैकी तीन प्रवेश द्वार दुर्लक्षी धोरणामुळे जमीनदोस्त झाले आहेत. तर एका प्रवेश द्वार अखेरची घटीका मोजत आहे. सध्या सेवाग्राम-पवनार विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामे पवनार गावात करण्यात येत आहेत. पण पवन राजाच्या काळातील ऐतिहासीक वास्तूकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे विशेष. आश्वासने विरली हवेत किल्ल्याच्या डागडुजीसाठी अनेकदा लोकप्रतिनिधींनी विकास निधी देण्याचे आश्वासने दिले. पण लोकप्रतिनिधींनी आपले आश्वासन पाळले नाही.  १९५८ चे अधिनियम नुसार किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक जाहीर करण्यात आले. १९ व्या शतकात तेथे हजरत सय्यद मोहम्मद कबीर यांचा दर्गाहची निर्मिती करण्यात आली. ते अनेकांचे श्रद्धास्थान आहे.   सध्या हे स्मारक पुरातत्व विभागाकडे असून सर्व जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

निर्मितीनंतर एकदाही झाली नाही किल्ल्याची डागडुजी

पवनार येथील किल्ल्याची देखभाल तसेच दुरूस्तीची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे आहे. पण या विभागाकडून एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. किल्ल्याचा मागील भाग दिवसेंदिवस खचत असून चार पैकी तीन प्रवेशद्वार नामशेष झाले आहे. तर एक प्रवेशद्वार अखेरची घटीका मोजत आहे.

पवन राजाचा किल्ला हे पवनार गावाचे वैभव आहे. परंतु, आता तो पूर्णत: ढासळला आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाचे याकडे लक्ष देवून गावाचे वैभव वाचविले पाहिजे. ग्रा. पं. ने अनेकदा पत्रव्यवहार केलेत. - शालिनी आदमने, सरपंच, पवनार.

किल्ला परिसरातील प्राचिन विहिरीवरून राणी स्वत: पाणी भरायची. राज्याने दिलेल्या वचनानुसार अहमद कबीर बाबा यांना किल्ल्यावर आपली कबर बनविण्याची अनुमती दिली, असे सांगितल्या जाते.- बब्बु शेख, दर्गाह, पुजारी, पवनार. 

 

टॅग्स :Fortगड