शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याकरिता १२.४३ कोटी मंजूर

By admin | Updated: December 29, 2016 00:46 IST

जिल्ह्यातील एकूण नऊ ग्रामीण रस्त्याच्या कामाकरिता १२ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये ग्रामविकास विभागाने मंजूर केले आहे.

रामदास तडस : २६.२६ कि़मी. लांबीच्या नऊ ग्रामीण रस्त्यांचा विकास वर्धा : जिल्ह्यातील एकूण नऊ ग्रामीण रस्त्याच्या कामाकरिता १२ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये ग्रामविकास विभागाने मंजूर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात बॅच तीन अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावणार असून तसा निर्णय नुकताच झाल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. सदर रस्त्यात आर्वी तालुक्यातील एसएचडब्ल्यू २९५ ते दिघी मार्ग ५.७८ कि़मी, आष्टी तालुक्यातील एनएच ६ ते भिष्णूर मार्ग १.४० कि़मी., कारंजा तालुक्यातील ओडीआर ८७ ते पांजरा मार्ग १.५० कि़मी., व एमडीआर ५ ते खैरी मार्ग ३ कि़मी., देवळी तालुक्यातील बाभुळगाव ते सैदापूर रस्ता ३ कि़मी., हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही ते ढिवरी-पिपरी रस्ता १.५१ कि़मी., सेलू तालुक्यातील एनएच ३६१ कान्हापूर ते वाहितपूर रस्ता २.५३ कि़मी. व एसएच ३६१ ते ब्राम्हणी पर्यंत रस्ता १.१४ कि़मी. वर्धा तालुक्यातील एस एच.३२६ करंजी (भोगे) ते पूजई रस्ता ६.४० कि़मी. अशा २६.२६ कि़मीचे नऊ ग्रामीण रस्ते दुरूस्तीचा कार्यक्रम मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्याला ग्रामीण भागाकरिता चांगल्या दर्जाचे ग्रामीण रस्ते उपलब्ध होणार आहे. सदर प्रशासकीय मान्यता २०१६-१७ या वित्तीय वर्षात टप्पा क्र. ३ अंतर्गत मंजूर झाली आहे. या पुढे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून ग्रामीण विकासाचा नवा पायंडा महाराष्ट्रात पाडतील. ग्रामीण भागाकरिता जिल्हा नियोजन समिती व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते विकास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण विकासाकरिता नवीन विकल्प जनतेला उपलब्ध झालेला आहे.(प्रतिनिधी)