शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आईबाबावर रागावला आहात , मग  प्लिज हे वाचा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 08:47 IST

आईबाबांवर रागावून कसं चालेल? ते ‘वर्क फ्रॉम होम’ असतील, तर त्यांना काम करावंच लागणार ना आत्ता!

ठळक मुद्देफारतर एक करा, आईबाबांना म्हणावं, जरा तुमच्या वर्क फ्रॉम होमला शिस्त लावा.

 माझ्या संतापलेल्या मित्रा,तुझं पत्र वाचून तुझा संताप मला कळला. माझ्या सगळ्या टीमला कळला, माझ्या टीममध्ये काही मोठे लोक ठेवलेत ना कामाला, ते ही आईबाबा आहेत. त्यांनाही कळला. त्यांच्या तर डोळ्यात पाणीच आलं कारण ते पण वर्क फ्रॉम होम आहेत. त्यांची मुलं पण म्हणो त्यांच्यावर अशीच चिडली आहेत. एकानं तर कट्टी केली होती काल आईशी.पण आता मला मदत करायची तर त्याच्या आईलाही वर्क फ्रॉम होम करणं भाग आहे. पण त्यालाही तसंच वाटतंय की,  माझ्याआईचं काम काही महत्वाचं नाही. आता सांग, त्याच्या आईचं काम महत्वाचं आहे की नाही?तुङो कालचे प्रश्न वाचून मी काही मोठ्यांशी स्पेशली ज्यांची मुलं छोटी आहेत, अशा आईबाबांशी बोलले. आणि विचारलं त्यांना की तुम्ही का नाही सुटी घेत, तुमचं काम काय तुमच्या मुलांपेक्षा महत्वाचं आहे का?तर सगळ्यांनी सांगितलं की, आमचं काम काही आमच्या मुलांपेक्षा महत्वाचं नाहीच्चे, पण काम करायलाच लागणार.मी विचारलं का?तर त्यांनी ही कारणं सांगितली.

1. डॉक्टर्स, नर्स, पोलीसकाका, सफाईकाका, बॅँकेत जॉब करणारे काका-काकू, सरकारी नोकरी करणारे काका काकू आणि असे कितीतरीजण आहेत, ते तर त्यांच्या मुलांना घरी ठेवून कामावर जातात. का? तर सगळ्या समाजाला त्यांच्या कामाची मदत आहे. त्यांच्या मुलांनी त्यांना कामावर जाऊच दिलं नाही तर आपल्या घरी पाणी येणार नाही, बाकीचं काय सांगता. त्यामुळे त्यांच्या मुलांना आणि त्यांना पहिले थॅँक्यू म्हणून टाकू!2. आता जे आईबाबा घरुन काम करतात, त्यांच्या कंपनीला नाईलाजाने त्यांना सांगावं लागलं आहे की घरुन काम करा, कारण काम थांबवता नाही येत.  तशी परवानगी नसते नाहीतर सगळं ठप्प होऊन जाईल. प्रत्येक काम महत्वाचं आहे आणि देश असा बंद केलेला असताना आपलं काम करणं, चांगलं करणं ही जबाबदारीच आहे आईबाबांची.3. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण आपल्या पिगी बॅँकमध्ये पैसे टाकतो. ते टाकलेच नाही आणि टाकलेले सगळे काढले तर एकदिवस ते संपतीलच ना. तसंच आईबाबांचा पगार झाला नाही तर एटीएममधून येणारे पैसे बंद होतील कारण त्यांच्या बॅँकेतले पैसेच संपतील. मग आपण अन्नधान्य कसं आणणार? जेवणार कसे?4. मोदीआबा म्हणालेत की आईबाबांना घराबाहेर जाऊ देऊ नका, पण त्यांना काम करु देऊ नका असं नाही म्हणालेत.5. फारतर एक करा, आईबाबांना म्हणावं, जरा तुमच्या वर्क फ्रॉम होमला शिस्त लावा. ऑफिसच्या वेळेत काम करा, तेव्हा मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. मात्र ती वेळ संपली, की तुम्ही माझे   ! मग जर तुम्ही मोबाइलवर व्हॉट्सअॅप खेळलात, तर चालणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त.6. नाहीच आईबाबांनी ऐकलं तर मी आहेच, असा खरमरीत लेख लिहिन ना, की आईबाबा सॉरीच म्हणतील तुम्हाला! कर के देखो.- तुमची शिस्तीची मैत्रीण ऊर्जा