शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मोठी माणसं सारखी आपल्याला कामं सांगतात, असं वाटतंय का तुम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 08:00 IST

घरातली सगळी माणसं सगळी कामं तुम्हालाच सांगतात हे बरोबर आहे का?

ठळक मुद्देआजची 50 कामं

 तर आज काय करायचं? प्लीज घरातलं कुठलंही काम सांगू नका.  ‘नुसताच बसला / बसली आहेस!’ म्हणून घरच्यांनी पार बटाट्याचा कीससुद्धा यावर्षी घालायला लावलाय. त्यामुळे काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग असेल तर सांगा.. असं झालंय ना तुमचं पण? घरोघरच्या  लहान मुलांची हीच अवस्था झाली आहे. सारखी मोठी माणसं आपल्याला कामं सांगतात असं वाटतंय का तुम्हाला? तर आज आपण त्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. घ्या बरं एक मोठ्ठा कागद आणि पेन. आणि करा यादी.आपल्या घरात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपयर्ंत कुठली कुठली कामं होतात ती लिहूनच काढा एका कागदावर. लिहायचा कंटाळा येत असेल तर चित्र काढा. म्हणजे स्वयंपाकासाठी कूकर किंवा गॅस, नाश्त्यासाठी कढई, चहासाठी कप, कपडे धुण्यासाठी बादली, वाळत घातलेले कपडे, इस्त्री, गाद्या घालण्यासाठी पलंग आणि मच्छरदाणी अशी चित्र काढा. किंवा सरळ त्या कामांची यादी करा.नीट आठवून कामं लिहा. कारण घरात खूप लहान लहान कामं सतत चालू असतात. म्हणजे आपण स्वयंपाक हे एकच काम धरतो. पण त्यात पोळ्या / भाकरी, भाजी, आमटी, भात, चटण्या, कोशिंबीर असे बरेच पदार्थ असतात. ते पण एका वेळच्या जेवणात. रात्रीच्या जेवणाला पुन्हा तेच सगळं. शिवाय एकाला बटाटा आवडतो, दुस?्याला पालक आवडत नाही असं असतंच. शिवाय मधल्या वेळचे खाण्याचे पदार्थ, नाश्ता, काहीतरी गोड पदार्थ हे सगळं स्वयंपाक याच सदरात मोडतं. त्याशिवाय घरात कुठली कामं असतात त्याची यादी करा. त्यात किमान 5क् कामं तुम्हाला सापडली पाहिजेत.ही यादी झाली, की तुमचं खरं काम सुरु होईल. आता या यादीतल्या कामांना वेगवेगळे रंग द्यायचे आहेत. जी कामं जनरली आई / आजी / वहिनी / आत्या / ताई करते त्याला पिवळा रंग, जी कामं जनरली वडील / आजोबा / काका / दादा करतात त्यांना निळा रंग आणि जी कामं जनरली रोज तुम्ही करता त्याला हिरवा रंग.

आता ती रंगीत यादी समोर ठेवा आणि प्रामाणिकपणो सांगा की तुम्हालाच घरातली सगळी कामं सांगतात हे बरोबर आहे का? आणि हिरवा रंग थोडा तरी वाढवून, एखाद दोन कामांची रोजची जबाबदारी घेऊन आपण आई किंवा वडिलांचं काम थोडं सोपं करू शकतो का?