- चेतन एरंडे,
मुलं नुसती एकत्र येत नाहीयेत तर बरेच काही शिकत आहेत, हे मुलांनी स्क्रॅच मध्ये तयार केलेल्या गोष्टीवरून समजले. यानिमित्ताने मुले ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन ऍप्लिकेशन वापरत आहेत, हे पहिल्यांदाच समजले. ‘हे कधी वापरायला सुरु केलं?’’- असं मुलांना विचारल्यावर, आधीच्या ऍप्लिकेशनमध्ये काय त्रुटी होत्या? त्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम येत होते? हे प्रॉब्लेम सोडवायचे ठरवल्यावर ऑनलाईन मिटिंगसाठी नवीन सॉफ्टवेअर त्यांनी कसे निवडले? हे सगळे मुद्देसूद सांगितले! एवढेच नाहीत तर हे नवीन ?प्लिकेशन वापरण्यासाठी त्यांनी एकमेकांचे ‘ट्रेनिंग’ कसे घेतले हेही सांगितले.मुलांना कुठलही काम सांगितलं ना, की मुलं ते काम अध्र्यावर सोडून देतात, त्यासाठी नको नको ती कारण शोधतात अशी मुलांची एक इमेज आमच्या मनात होती. इथे मात्र एक ऍप्लिकेशन चालत नाही तर दुसरं वापर, लॅपटॉप बंद पडला, मोबाईल वापर, लाईट गेले तर सेशनची वेळ बदल एवढंच नाही तर एखादा मित्र त्यादिवशी सेशनला येऊ शकला नाही, तर आज कोणती गोष्ट शिकली हे त्याला समजून सांगण्याची जबाबदारी घे व त्यासाठी वेगळा वेळ काढ हे सगळं ही मुलं लीलया करत होती!