शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ये  लो , घर  में  स्टायलिश टी  शर्ट बनाने  का  जादू ! - पुराने  शर्ट  का रिमेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 14:42 IST

जर घरात फॅब्रिक पेंट असेल तर ती शर्टवर तुम्हाला हवं ते रंगवा. 

ठळक मुद्देजुन्या लाडक्या टीशर्टचा रिमेक

आई वर्षातून एकदोन वेळा तरी जुने कपडे देऊन टाका म्हणून मागे लागते. आपल्याला आपले काही टीशर्ट कध्धीच द्यायचे नसतात. म्हणजे आपण म्हातारे झालो तरी आपल्याजवळ ते टीशर्ट हवेत असंच आपल्याला वाटत असतं. पण आईला तसं वाटत नसतं ना! झाला का लोचा. मग आपण एक आयडिया करूया, जुन्या टीशर्टचा रिमेक करूया, म्हणजे आई ते लगेच देऊन टाक म्हणणार नाही. साहित्य: जुना लाडका टीशर्ट, कात्री, फॅब्रिक कलर्स असतील तर ते. नसतील तर रंगकाम लॉक डाऊन संपून बाहेर पडण्याची परवानगी मिळाल्यानंतर. कृती: 1) तुमचा जुना लाडका टीशर्ट व्यवस्थित स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून घ्या. 2) त्याला हलकीशी इस्त्री करा. कारण खूप चुण्या असतील तर रिमेक नीट होणार नाही. हे काम करायला आईबाबांची किंवा घरातल्या मोठ्या माणसाची मदत घ्या. 3) आता टीशर्टच्या खालच्या बाजूने 2 इंचांच्या अंतरावर दीड इंच उभी रेष मारून घ्या. त्यासाठी पेन्सिल किंवा पेन वापरा. संपूर्ण खालच्या बाजूने हे करा. 4) आता या दीड इंच उभ्या रेषेवर आपल्याला कापायचं आहे. त्यासाठी टीशर्टची पुढची आणि मागची बाजू एकत्र धरून कापा. म्हणजे दोन्ही बाजूने सारखे कापले जाईल. 

5) आता समोरच्या बाजूच्या पहिल्या दोन कापलेल्या बाजूंची गाठ मारा. टीशर्टच्या पुढच्या मागच्या कापलेल्या ठिकाणी अशा गाठी मारा. गाठी चांगल्या पक्क्या मारा. 6) खालून तुमचा टीशर्ट एकदम डिझायनर झाला आहे. 7) जर घरात फॅब्रिक पेंट असेल तर ती शर्टवर तुम्हाला हवं ते रंगवा. 8) वाळू द्या. तुमचा टीशर्ट रिमेक होऊन परत घालायला तयार आहे. 

9) घरात रंग नसेल तर रंगासाठी तुम्ही हट्ट करणार नाही हे माहित आहे. 10) लॉक डाऊन संपे पयर्ंत थांबा. सगळं नेहमीसारखं सुरळीत सुरु झालं की टीशर्ट रंगवा. किंवा रंगवूच नका. नुसत्या गाठी मारलेला टीशर्टही भारी दिसतो.