शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचं कधी जंगलबुक असतं का ? नसतं ? - मग बनवा तुम्ही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 07:50 IST

दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

ठळक मुद्देचला, आज आपण हे बनवून पाहूया

भाज्या खायचा आपल्याला कंटाळा येतोच ना, पण त्या खाल्ल्या पाहिजेत त्याच बरोबर आता एक सोपी युक्ती वापरून भन्नाट चित्र तयार करूया. साहित्य: वृत्तपत्र, पांढरा कागद, जुना टूथ ब्रश, भेंडीचे दोन तुकडे, दोन फ्लॉवरची फुलं, निरनिरळ्या प्राण्यांचे कापलेले आकार (हे तुम्हाला जुन्या मासिकातून किंवा पेपरमधून कापता येतील.), काळ स्केच पेन, रंग कृती: 1) सगळ्यात पहिल्यांदा जंगल बनवूया. त्यासाठी हिरव्या रंगाच्या दोन तीन शेड्स तयार करा. आता भेंडीचा कापलेला भाग आहे तो रंगात बुडवा आणि त्याचा ठसा मारा. आधी कच्च्या कागदावर मारून बघा. म्हणजे आकार नीट येतोय ना हे लक्षात येईल. 2) कागदाच्या खालच्या बाजूने पाव कागद आपल्याला जंगल बनवायचं आहे. भेंडी, फ्लॉवर चे ठसे आणि त्यात अधून मधून झाडांचे बुंधे, वेली असं डिझाईन तयार करा. 3) जंगल झालं की, जे प्राण्यांचे आकार तुम्ही कापून घेतले होते ते वरच्या उरलेल्या भागावर ठेवा. जंगलात प्राणी कसे असतील असा विचार करून हे आकार ठेवा. अगदी एक रेषेत नकोत. 4) आता हिरव्या रंगाच्या निरनिरळ्या शेड्स मध्ये जुने ब्रश बुडवा आणि या प्राण्यांच्या आकाराच्या आजूबाजूचा सगळा पांढरा भाग ब्रश स्प्रेने हिरवा करून टाका. 5) हिरव्या रंगाच्या निरनिरळ्या शेड्स वापरा म्हणजे जंगल उठावदार दिसेल. 6) रंग वाळला की हळूच प्राण्यांचे आकार काढून घ्या. हिरव्या स्प्रेमध्ये मस्तपैकी प्राण्यांचे पांढरे आकार तयार झालेले असतील. 7) आता तुम्हाला हवं असेल तर या प्राण्यांच्या आकारांना काळ्या स्केचपेन ने बॉर्डर करा. पण आत रंग भरू नका. हे आकार पांढरेच राहू द्या. 8) तुमचं मस्त जंगल बुक तयार आहे.