शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

नाचो नाचो व्यायामवाली बिट पे ..:)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 07:55 IST

डान्स हा एक फार म्हणजे फारच भारी व्यायाम आहे!

ठळक मुद्दे किती भारी व्यायाम आहे हा, हे तुमचं तुम्हालाच कळेल.

मला सांगा, तुमच्यापैकी कोण लाजतं? काहीही सांगितलं की कोणाला लाज वाटते?हा अनुभव तुमच्यापैकी जवळजवळ प्रत्येकानंच घेतला असेल. आपल्याकडे कधी पाहुणो आले असतील, आई-बाबांचे मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाइक आले असतील, तेव्हा त्यांनी तुम्हाला काहीतरी करून दाखवायला सांगितलं असेल. एखादी कविता, गाणं, डान्स.. असं काहीही.एकतर आई-बाबांनी तुम्हाला तसं करून दाखवायला सांगितलं असेल, किंवा त्या काका-काकूंनी. कधीकधी शाळेतच शिक्षकांनी एखादी कृती तुम्हाला सगळ्यांसमोर करून दाखवायला सांगितली असेल! त्यावेळी तुम्ही किती लाजला होता, किती आग्रह केल्यावर काहींनी ती कृती केली, तर काहींनी केलीच नाही, हेही मला माहीत आहे.खरंतर जे आपल्याला येतं, आपण घरात सहजपणो ज्या कृती करतो, त्याच कृती आपल्याला करायच्या होत्या, पण केवळ ‘लाज’ वाटल्यामुळे आपण ती कृती केली नाही.आज आपल्याला अशीच एक कृती करायची आहे. सगळ्यांना आवडणारी. - डान्स करायचाय!मग तुम्ही तो आपल्या घरातल्या लोकांसमोर करा किंवा एकांतात. तुम्हाला आवडेल तिथे आणि आवडेल तसा.एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, आपल्याला येत नाही, असं म्हणायचं नाही. आणि खरं तर जो वेडेवाकडे हातपाय हलवत नाचू शकतो, तोच खरा डान्सर असतो. कारण त्याच्यासारखं कोणालाच ठरवूनही नाचता येत नाही.मग नाचणार आज?कसं नाचायचं?

1- सरळ, वाकडे कसेही उभे राहा, बसा, झोपा. 2- आपल्याला आवडतील तसे हातपाय, शरीर हलवा.3- शक्यतो आपल्या शरीराचे जेवढे अवयव हलवता येतील तेवढे हलवा. हात, पाय, डोकं, मान, कंबर, डोळे, भुवया, नाक, कान, कोपर, घोटे, गुडघे. असं काहीही.4- तुम्हाला हा डान्स मोबाइलवर तुमचं आवडतं गाणं लावून करता येईल, टीव्ही पाहता पाहता करता येईल किंवा तुमचं तुम्हीच गाणं म्हणता म्हणता किंवा अगदी गप्प राहूनही करता येईल.5- आपले जास्तीत जास्त अवयव हलले पाहिजेत, तसा प्रय} केला पाहिजे, हाच त्यातल्या त्यात नियम.काय होईल या डान्सनं?1- यामुळे तुमच्या शरीराचा सर्वागीण व्यायाम होईल.2- तुमची लवचिकता वाढेल, पॉवर वाढेल, हातापायांतली ताकद वाढेल.3- हृदयासाठीही हा व्यायाम चांगला आहे. 4- घरातल्याच कोणालातरी किंवा तुमचा तुम्हीच याचा व्हीडीओही मोबाईलवर शूट करा आणि अधूनमधून पाहा. किती भारी व्यायाम आहे हा, हे तुमचं तुम्हालाच कळेल.- तुमचीच ‘डिस्को डान्सर’, ऊर्जा