जगभर मुलं काय काय धमाल गोष्टी करत असतात. कुणाला कशातून प्रेरणा मिळेल सांगता येत नाही. कुणी पर्यावरण रक्षणाचा विडा उचलतं तर कुणी स्वत:च्या आजारावर मात करतं आणि हे सगळं लहान मुलंच करतात बरं का! तुमच्यासारखीच. तर आजची गोष्ट आहे केनेथ शिनोझुका या मुलाची. केनेथच्या आजोबांना अल्झायमर होता. अल्झायमर हा एक प्रकारचा विस्मृतीचा आजार आहे. यात ज्यांना हा आजार होतो त्यांना दिवसेंदिवस विस्मरण व्हायला लागतं. इतकं की जवळच्या माणसांनाही ते ओळखेनासे होतात. त्यांची काळजी घेणंकठीण होऊन बसतं. ही माणसं वेळीअवेळी घराबाहेर पडातात आणि मग घराचा पत्ता विसरून जातात. घर न सापडल्याने हरवतात. केनेथच्या आजोबांच्या बाबतीतही असं सगळं होत होतं. यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण करायचं काय? म्हणून मग केनेथने एक प्रेशर सेन्सर तयार केलं. जे आजोबांच्या पलंगापाशी ठेवता येईल जेणोकरून त्यावर आजोबांचा पाय पडला तर त्यांची काळजी घेणा?्या व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये अलर्ट वाजेल आणि त्या व्यक्तीला आजोबा उठले आहेत हे समजू शकेल.
त्यासाठी गुगलवर जाऊन kenneth shinozukaÔ असं इंग्लिशमध्ये टाईप करा.