शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या घरी ट्रेकिंग करा, त्यासाठी ना डोंगर हवा , ना  साहित्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 09:33 IST

आज घरच्या घरी ट्रेकिंग!

ठळक मुद्देयामुळे तुमच्या हातापायात ताकद येईल. त्यांच्यातलं कोओॅर्डिनेशन वाढेल. 

 ट्रेकिंगला कधी गेला आहात? डोंगर वगैरे चढला आहात? काय भन्नाट मजा येते ना? जेव्हा डोंगराची एखादी उभी चढण, छोटासा सरळसोट भाग, तेव्हा तो चढून जाताना एखादवेळेस तुमची फॅ फॅ ही झाली असेल.म्हणजे चढणीचा हा टप्पा आता चढायचा तरी कसा? मग तुम्ही तुमच्या आसपास त्या चढणीला कुठे खाचा आहेत का, तिथे पाय ठेवता येईल का, त्यावर बोटं रोवून वर जाता येईल का, असा अंदाज घेऊन चढणीचा हा टप्पा तुम्ही निश्चितच पार केला असेल.आज हाच आपला व्यायाम आहे. चलो डोंगर चढनेको!. घराबाहेर जायचं नाहीये हे माहितीये मला, पण  आज खरोखरच आपल्याला ट्रेकिंग, माऊण्टेनिअरिंग करायचंय.  आणि तेही घरच्या घरी! चला, तर मग!काय करायचं?-1. जमिनीवर आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय टेका. 2. मनातल्या मनात असा विचार करा, ही जमीन आडवी नसून उभी भिंत आहे आणि आपण सुपरमॅन आहोत!3. आता चढायला लागा ही भिंत. 4. हाताच्या कोपराजवळ आपला एक गुडघा वाकवून पुढे घ्या. 5. मग हात पुढे घेऊन दुसरा पाय. बघा, ट्रेकिंगचा फिल तुम्हाला येतो की नाही ते!6. आज थोडा चढून बघा, नंतर हळूहळू प्रॅक्टिस वाढवा. 7. यामुळे तुमच्या हातापायात ताकद येईल. त्यांच्यातलं कोओॅर्डिनेशन वाढेल. नंतर काही दिवसांनी खरोखरचा डोंगरही तुम्ही एकदम इङिाली चढून जाल!

- तुमची ‘डोंगरचढी’ मैत्रीण,  ऊर्जा