शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

इन्फोमॅनिया म्हणजे काय? हा कुठला नवा आजार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 08:00 IST

सतत माहितीसाठी धडपण्याला या विषयात काम करणारे इन्फोमॅनिया म्हणतात. 

ठळक मुद्देअनेकदा चुकीची माहिती, खोटी माहितीही आपल्यापर्यंत  पोचत असते. 

मी पेपर वाचत असताना लॉक डाऊन मुळे लोकांना इन्फोमॅनिया झाला आहे असं वाचलं. इन्फोमॅनिया म्हणजे काय? - आदित्य शिरोळकर, सांगली

आदित्य, सध्या घरातली सगळीच माणसं सतत ऑनलाईन आहेत. त्यामुळे सतत प्रचंड माहिती पोचत असते. या इतक्या सगळ्या माहितीची आपल्याला गरज आहे की नाही हे वेगळं पण व्हॉट्स ऍप मुळे आणि इतरही अनेक ऍप  आणि सोशल मीडियामुळे आपल्याला गरज नसतानाही प्रचंड माहिती आपल्या पुढ्यात असते आणि आपण ती वाचत, बघत ऐकत असतो.  आता याचा विचार कर-1. सतत माहिती मिळत राहिली नाही तर आपलं आयुष्य अपूर्ण आहे असं वाटणं म्हणजे इन्फोमेनिया. 

2. माहिती मिळवण्याचं आणि त्याचा उपभोग घेण्याचं व्यसन लागू शकतं का? तर हो. कोरोना विषयीच्या खऱ्या  खोट्या माहितीचा अतिरेक झालेला आहे तरीही लोक सतत त्याविषयी शोधत असतात, वाचत असतात. किंवा सतत सोशल मीडियावर जाऊन वेगवेगळी माहिती गोळा करत असतात. 3. या सगळ्या माहितीचा आपल्याला उपयोग असतो का? तर नक्कीच नाही, पण ती मिळवली नाही तर आपण जगाच्या मागे पडू अशी भीती निर्माण होते आणि लोक अधिकाधिक माहितीच्या मागे लागतात.  4. त्यासाठी मग सतत ऑनलाईन राहणं, सतत फोनवर येणाऱ्या  बातम्यांचे नोटिफिकेशन्स बघत बसणं, नेट बंद झालं तर कसंतरी होणं हे प्रकार सुरु होतात. 5. माहितीची गरज आहेच पण त्याचा अतिरेक धोकादायक असतो. 6. शिवाय सोशल मीडियाच्या या काळात आपल्या पर्यंत  पोचणारी सगळी माहिती खरी असतेच असं नाही. अनेकदा चुकीची माहिती, खोटी माहितीही आपल्यापर्यंत  पोचत असते. - त्यामुळे असं सतत माहितीसाठी धडपण्याला या विषयात काम करणारे इन्फोमॅनिया म्हणतात.