शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतलं ‘ट्रान्केबार’ हे गाव थेट युरोपातल्या एका देशात घेवून जातं. या गावात आहे डच संस्कृतीच्या अनेक खुणा.

By admin | Updated: July 5, 2017 19:44 IST

‘गाणाऱ्या लाटांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणारंट्रान्केबार गाव तुम्हाला घेऊन जातं थेट युरोपमधल्या एका देशामध्ये म्हणजे डेन्मार्कमध्ये!

-अमृता कदमतामिळनाडूमधल्या कारिकलपासून 15 किलोमीटर अंतरावर वसलं आहे एक छोटंसं गाव. ‘गाणाऱ्या लाटांचं गाव’ म्हणून ओळखलं जाणारं हे गाव तुम्हाला घेऊन जातं थेट युरोपमधल्या एका देशामध्ये म्हणजे डेन्मार्कमध्ये!या गावाच्या प्रवेशद्वारापाशीच तुम्हाला इथल्या वेगळेपणाची कल्पना येते. या गावाच्या प्रवेशद्वाराचं स्थापत्य थेट डॅनिश शाही स्थापत्यशैलीची आठवण करु न देतं. जागोजागी डच संस्कृतीच्या खुणा बाळगणारं हे गाव आहे ट्रान्केबार. अर्थात ट्रान्केबार हे या गावाचं जुनं नाव आहे, डचांच्या काळातलं! तमीळ भाषेत या गावाचं नाव आहे थरंगमबाडी.

ट्रान्केबार गावात काय काय दिसतं? 17 व्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या डचांनी पॉंडिचेरीमध्ये आपली व्यापारी केंद्र उभारायला सुरूवात केली होती. त्याच काळात ओव्ह गिड नावाच्या डॅनिश अ‍ॅडमिरलला या गावातल्या शांत, सुंदर, निवांत किनाऱ्यांनी आकर्षून घेतलं. त्यामुळे तंजावरच्या महाराजांकडून व्यापारी हक्क मिळाल्यानंतर इथे एक किल्ला बांधण्याचं ठरवलं. हा किल्ला ‘फोर्ट डान्सबोर्ग’ म्हणून ओळखला जातो. व्यापाराचा विस्तार करताना युरोपीयन सत्तांचं अजून एक उद्देश होतं, ते म्हणजे धर्मांतर. मग डचही त्यात कसे मागे राहतील? धर्मांतरासाठी हे लहानसं गाव सोपं लक्ष होतं. धर्मांतराबरोबरच इथे ख्रिश्चन आस्था- प्रतीकंही आली. युरोपियन वळणाची चर्चेस आजही इथे दिमाखात उभी आहेत.

 

सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे, या किनाऱ्याला लागून असलेल्या कॉलनी, देवळं, चर्च आणि म्युझियम्स असं सगळं काही या गावामध्ये पाहायला मिळतं. निवांतपणे चार दिवस घालवायचे असतील तर ही जागा तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम !भारतातलं पहिलं प्रोटेस्टन्ट चर्चही ट्रान्केबारमध्ये उभं राहिलं. झिआॅन चर्च. जर्मन मिशनऱ्यांनी 1718 मध्ये बांधलेलं न्यू जेरूसलेम चर्चही प्रसिद्ध आहे. पण पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं फोर्ट डान्सबोर्ग. हा डचांनी भारतात बांधलेला दुसरा मोठा किल्ला. किल्ल्याची भव्य तटबंदी, तोफा आणि इतर युद्धसाहित्यासोबतच या किल्ल्यात प्राचीन नाण्यांपासून अनेक ऐतिहासिक वस्तू जतन केल्या गेल्या आहेत.

 

तुम्ही विचाराल फिरण्याचं तर ठीक आहे, पण या छोट्या गावात राहण्याची सोय काय? समुद्रकिनाऱ्यावरचे टुमदार बंगले तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. या बंगल्यांमध्ये राहताना डेन्मार्कमध्ये राहण्याचा अनुभव नक्की येईल. कारण यातले अनेक बंगले हे डचांनी वसाहती वसवण्याच्या काळातले आहेत.फारसं प्रसिद्ध टूरिस्ट डेस्टिनेशन नसल्यामुळे बऱ्याचजणांना इथपर्यंत कसं यायचं हे माहित नसेल. ट्रान्केबारला पोहचण्यासाठी तुम्हाला आधी चेन्नईला जावं लागतं. चेन्नईवरु न ट्रान्केबारला जाण्यासाठी ट्रेन्स आहेत. किंवा चेन्नईहून त्रिचीला जाणाऱ्या फ्लाईट्सही आहेत. त्रिचीपासून ट्रान्केबार तीन-चार तासांच्या अंतरावर आहे. प्रवास लांबचा असला तरी या गावामध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही तुमचा सगळा शिणवटा विसरून निवांतपणाचा अनुभव घ्याल हे नक्की!