शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटांच्या रांगेतून होणार सुटका

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

तिकिटांच्या रांगेतून होणार सुटका

तिकिटांच्या रांगेतून होणार सुटका
मोबाईल तिकिट सेेवेचा पश्चिम रेल्वेवर आजपासून शुभारंभ
मुंबई - पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल तिकिट सेवा काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. मात्र या सेवेत मोबाईलवर आलेल्या माहीतीनंतरही प्रवाशांना तिकिटाची एटीव्हीएम मशिनवरुन प्रिंट काढावी लागते. यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याने त्यात बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यात बदल करुन मोबाईलवरच लोकलचे तिकिट ग्राह्य धरण्यासाठी योजना आखण्यात आली असून त्याचा शुभारंभ पश्चिम रेल्वे मार्गावर होत आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते बुधवारी हा शंुभारंभ केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी मोबाईल तिकीट सेवा काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. गुगल प्ले आणि विंडोज स्टोअरमधून मोबाईल तिकीट सेवा डाऊनलोड केल्यानंतर ही सेवा प्रवाशांना उपलब्ध होत आहे. प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव यात नोंदवावे लागते. त्यानंतर अनेक प्रक्रिया पार पडल्यानंतर स्थानकावर जाऊन युनिक बुकींग आयडीव्दारे एटीव्हीएमवर तिकिटांची प्रिंट मिळते. मात्र या सर्व प्रक्रियेत बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याने या सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळू लागला. प्रवाशांचा हा मनस्ताप दूर करण्यासाठी अखेर रेल्वे प्रशासनाने मोबाईलवरील तिकिटच ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर काम सुरु केले. प्रथम चेन्नईत याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईकरांसाठी ही सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला. या सेवेचा प्रवाशांनी गैरवापर करु नये यासाठी इस्त्रोचीही मदत घेण्यात आली. अखेर सर्व तांत्रिक समस्या दूर केल्यानंतर प्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील या सेवेचा बुधवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीतूनच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे शुभारंभ केला जाणार आहे.