शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जगातल्या या दहा ठिकाणी तम्ही सेल्फी काढू शकत नाही! इथे जाताना सामानामध्ये सेल्फी स्टिक पॅक करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:13 IST

जगात अशीही काही प्रेक्षणीय ठिकाणं आहेत जिथे सेल्फी काढायला परवानगीच नाही. त्यामुळे तिथे जाताना सेल्फी स्टिक पॅक नाही केली तरी काहीही अडणार नाही. आणि तिथलं सौंदर्यच इतकं भुरळ पाडणारं आणि एकरूप करणारं आहे की आपल्याला सेल्फी काढायला मिळत नाहीये याची हूरहूर वाटत नाही.

ठळक मुद्दे* इटलीमधल्या मिलानमध्ये सेल्फी स्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. काही दिवसांपूर्वीच मिलानमध्ये सेल्फी स्टिक, फूड ट्रक आणि अल्कोहोलवर पूर्णपणे बंदी घातलीये.* वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे, लंडनचा टॉवर, सेंट पॉल कॅथेड्रील किंवा इतर स्थापत्य पाहायला जाताना सेल्फी स्टिकला रजाच द्या.* मध्य आशियातल्या देशांना भेट देताना कोणत्या ठिकाणी सेल्फी काढता येतो आणि कोणत्या ठिकाणी नाही याची माहिती आधीच करून घ्या.* मोठ्या उत्सवात सेल्फीसाठी धडपडपणं हे ब्राझीलियन लोकांच्या कल्पनेतही येत नाही.*केवळ मनाई आहे म्हणून या ठिकाणी सेल्फीच्या मोहाला आवर घालण्यापेक्षा कुठे सेल्फी काढायचा आणि कुठे नाही याचं भान स्वत:मध्ये आणणं अधिक गरजेचं आहे.

 

- अमृता कदमआजकाल प्रवासाला जाताना सामानामध्ये एक गोष्ट एकदम आवश्यक झालीये. ती म्हणजे सेल्फी स्टिक. समुद्रकिनारे असोत की पर्वतरांगा, जंगलातली ट्रीप असो की सुंदर वास्तुशिल्पं असोत, प्रत्येकाला या ठिकाणांपेक्षा तिथे जाऊन स्वत:चीच छबी कॅमेर्यात कैद करण्यात रस असतो. हे काम सोपं होतं ते सेल्फी स्टिकमुळे. पण जगात अशीही काही प्रेक्षणीय ठिकाणं आहेत जिथे सेल्फी काढायला परवानगीच नाही. त्यामुळे तिथे जाताना सेल्फी स्टिक पॅक नाही केली तरी काहीही अडणार नाही. आणि तिथलं सौंदर्यच इतकं भुरळ पाडणारं आणि एकरूप करणारं आहे की आपल्याला सेल्फी काढायला मिळत नाहीये याची हूरहूर वाटत नाही.इथे सेल्फीला परवानगी नाही! 

मिलान

तुम्ही जर इटलीला फिरायला जात असाल तर लक्षात ठेवा की मिलानमध्ये सेल्फी स्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. काही दिवसांपूर्वीच मिलानमध्ये सेल्फी स्टिक, फूड ट्रक आणि अल्कोहोलवर पूर्णपणे बंदी घातलीये. मिलानमधल्या पर्यटकांच्या गर्दीला आवर घालण्याचा एक पर्याय म्हणून ही बंदी घातली गेलीये. सेल्फीच्या नादात रस्ते, प्रेक्षणीय स्थळांच्या इथे लोकं गरजेपेक्षा जास्त वेळ रेंगाळत असल्यामुळे ही खबरदारी घेतली असावी.

इंग्लंड

जर तुम्ही लंडनमधल्या म्युझियम, आर्ट गॅलरींना भेट देत असाल तर तुम्हाला तुमची सेल्फी स्टिक जमा करावी लागेल. वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे, लंडनचा टॉवर, सेंट पॉल कॅथेड्रील किंवा इतर स्थापत्य पाहायला जाताना सेल्फी स्टिकला रजाच द्या. लंडनमधल्या प्रसिद्ध मैदानांवर जातानाही तुम्हाला सेल्फी स्टिक घेऊन जाता येत नाही.

व्हर्सायचा राजवाडा

फ्रान्समधल्या या शाही ठिकाणाचं सौंदर्य नजरेत आणि मनात जितकं साठवता येईल तितकं साठवा. पण सेल्फी काढून इथल्या आठवणी सोबत न्यायचा विचार असेल तर तो मात्र सोडून द्या. सुरक्षेच्या कारणामुळे इथे सेल्फी काढता येत नाहीत. तुम्ही जर तुमची सेल्फी स्टिक नेहमीच्या सवयीनं सोबत ठेवली असेलच तर ती तुम्हाला इथल्या सुरक्षा अधिकार्याकडे जमा करावी लागते.न्यूयॉर्कमधली संग्रहालयं

मेट, ब्रूकलिन म्युझियम एमओएमएसारख्या म्युझियम्सनी सेल्फी स्टिकवर केव्हाच बंदी घातली आहे. आता या यादीत बिग अ‍ॅपलचाही समावेश झाला आहे. न्यूयॉर्कमधल्या इतरही काही प्रेक्षणीय ठिकाणांच्या इथे सेल्फीला बंदी आहे.चीन आणि जपान

जपानच्या जेआर वेस्ट ट्रेनच्या स्टेशन्सवर सेल्फी स्टीक बाहेर काढण्याचा विचार करु नका. दंडाच्या रूपात तुमच्या खिशाला चांगलीच चाट बसू शकते. चीनमधल्या संग्रहालयांमध्येही सेल्फी स्टीकवर बंदी आहे.मध्य आशिया

इराणमधल्या नॅशनल म्युझियममध्ये नुकतीच सेल्फी काढण्यावर बंदी घातली गेली आहे. सौदी अरेबियामधल्या मक्केमध्येही अजून हे सेल्फी कल्चर पचनी पडलेलं नाही. त्यामुळे मध्य आशियातल्या देशांना भेट देताना कोणत्या ठिकाणी सेल्फी काढता येतो आणि कोणत्या ठिकाणी नाही याची माहिती आधीच करूनघ्या.डिस्ने पार्क

जगभरातल्या डिस्ने पार्कमध्ये2015 मध्ये सेल्फी स्टिकवर बंदी घातली गेली. ही बंदी आजतागायत कायम आहे.कोचैला म्युझिक अ‍ॅण्ड आर्ट फेस्टिव्हल

कॅलिफोर्नियामध्ये हा महोत्सव दरवर्षी भरवला जातो. इथे जगभरातून गायक-संगीतकार येतात. तुम्हाला हरतर्हेचं संगीत या महोत्सवात ऐकायला मिळेल. त्याचबरोबर इन्स्टॉलेशन्स, मूर्तीकलेसारख्या वेगवेगळ्या कलाही सादर होतात. हे सर्व कॅमेर्यात कैद करण्यासाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर मात्र तुम्हाला तुमच्या उत्साहाला आवर घालावा लागेल. कारण सेल्फी स्टिक वापरु न शूट करायला किंवा फोटो काढायला इथे मनाई आहे. 

रिओ दि जानिरो

ब्राझीलमधल्या जगप्रसिद्ध कार्निव्हलची हवी तितकी मजा लुटा. पण जर हा कार्निव्हल पाहात असताना तुम्ही तुमच्या बॅगेतून सेल्फी स्टिक काढायची चूक केलीत तर मात्र आजूबाजूच्या लोकांच्या कपाळावर आठ्या पडतील. कारण एवढ्या मोठ्या उत्सवात सेल्फीसाठी धडपडपणं हे ब्राझीलियन लोकांच्या कल्पनेतही येत नाही.फोटोच्या रूपानं प्रवासातल्या आठवणी आपल्या सोबत आणणं वेगळं आणि जिथे-तिथे स्वत:चे फोटो काढण्याचा अट्टाहास करणं वेगळं. पण बर्याचदा हा फरक आपण लक्षातच घेत नाही. कदाचित म्हणूनच सरसकट मनाई करूनन आपल्या अतिउत्साहाला आवर घालण्याचा मार्ग पत्करावा लागतो. केवळ मनाई आहे म्हणून या ठिकाणी सेल्फीच्या मोहाला आवर घालण्यापेक्षा कुठे सेल्फी काढायचा आणि कुठे नाही याचं भान स्वत:मध्ये आणणं अधिक गरजेचं आहे.