शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 18:02 IST

वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूकीचे नियम पाळल्यावर दंड भरण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देसिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळेठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर मार्गदर्शन वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे : अमित काळे

ठाणे : वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे. सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये. सिग्नल लागल्यावर वाहनचालकांनी स्वत:हून थांबले पाहिजे. मी आधी जाईल यापेक्षा दुस:यांना आधी जायला सांगावे आणि सिग्नल सुटल्यावर ही भावना प्रत्येकात असेल तर वाहतूक कोंडी होणार नाही. तुमचा जीव मूल्यवान आहे, त्याची काळजी तुम्ही स्वत:हूनच घेतली पाहिजे असा सल्ला वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिला.      रोटरी क्लब ऑफ ठाणोच्यावतीने सहयोग मंदिर येथे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर काळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सुव्यवस्थित वाहतूक होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. भारतात दरवर्षी दीड लाख अपघाती मृत्यू होत आहे आणि ठाण्यात दरवर्षी 200 ते 250 रस्त्यावरचे अपघातात मृत्यू होतात. दुर्लक्षपणो जलद वाहतूक चालविल्याने, वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्यास, सिग्नल तोडल्याने अपघाती मृत्यू होतात. चुकीच्या दिशेने वाहतूक चालविण्याचा प्रकार भिवंडी, कल्याणमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. वाहतूकीच्या नियमांचे भंग करणा:या वाहनचालकाला पकडल्यास सुरूवातीला ते वाहतूक पोलीसांचे वाद करतात. मग ओळखीच्यांना फोन करण्याचे प्रकार सुरू होतात. आता आमच्या वाहतूक पोलीसांनी कोणाचेही फोन घेणो बंद केले आहे. आता 1क् पैकी 1क् वाहनचालक सिटबेल्ट लावतात तर 1क् पेकी 9 वाहनचालक हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे इतर रोडवर जास्त होतात. पादचारी चालताना वाहने पाहत नाही, कानात हेडफोन लावून चालतात. 50 टक्के पेक्षा अधिक अपघात हे दुचाकींचे होतात ते ही केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यावेळी एखाद्या नियमाची अंमलबजावणी करतो तेव्हा ते नियमांचे पालन करणो आवश्यक असते. दोन टक्के वाहनचालक नियम पाळत नाही 98 टक्के वाहन चालक नियम पाळतात असे चित्र दिसण्याऐवजी 98 टक्के वाहनचालक नियम मोडतात आणि केवळ दोन टक्केच वाहनचालक नियम पाळतात. शासनाने दंडाची रक्कम वाझवली तेव्हा त्या रक्कमेची तुलना रस्त्यांवरील खड्डे, आणि वाहतूक कोंडीशी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात हे दोन्ही विषय वेगळे आहेत. परंतू वाहनचालकांनी नियम पाळले तर दंड भरण्याची आवश्यकताच भासणार नाही. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबर वाहतूक नियमांची जागृतीही करत आहेत. विद्यार्थीदशेतच मुलांना वाहतूकीचे नियम आणि ते नियम मोडल्यावर होणा:या दुष्परिणामांची जाणीव करुन दिले तर घरातील वाहन चालविणारी मोठी मंडळी हे नियम निश्चितच पाळतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणोचे अध्यक्ष अच्युत दामले आणि सेक्रेटरी श्रीकांत तन्ना उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा