शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये नो पार्किंग धोरण महत्वाच्या २५ ठिकाणी मनाई : १५ स्पॉटवर एक बाजुने परवानगी

By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST

पनवेल : पेठांचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमध्ये वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अरुंद रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे वाहतुक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून पनवेल नगरपरीषद व वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्वाची २५ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीला लगाम बसणार असल्याचा विश्वास दोन्ही विभागांकडून व्यक्त करण्यात येत आहे .

पनवेल : पेठांचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेलमध्ये वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अरुंद रस्ते आणि पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे वाहतुक कोंडी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. यावर उपाय म्हणून पनवेल नगरपरीषद व वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्वाची २५ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीला लगाम बसणार असल्याचा विश्वास दोन्ही विभागांकडून व्यक्त करण्यात येत आहे .
पनवेलमध्ये अनेक मोठी दुकाने आणि मॉल्स उभे राहत आहेत. त्यामुळे ग्राहकांची सतत वर्दळ असते. ते मनमानीपणे रस्त्यावर गाड्या पार्क करतात. कापड व झवेरी बाजारात सतत वर्दळ असते. शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. जुन्या इमारतींची पुनर्बांधणीही होत आहे. नव्या इमारती बांधताना बांधकाम व्यावसायिक पार्किंगसाठी जागा ठेवतात, मात्र त्याबदल्यात घर घेणार्‍यांकडून लाखो रुपये वसूल करतात. हे टाळण्यासाठी अनेजण पार्किंगसाठी जागा घेत नाहीत आणि वाहने इतरत्र पार्क करतात. शहरात आजही अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगची सुविधाच नाही. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगवरून खटके उडतात.
दीडशे वर्ष जुन्या नगरपरीषदेने अद्याप वाहतुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन केलेलेच नाही. बांधकाम परवाना व भोगवटा प्रमाणपत्र देताना बांधकाम व्यावसायिकांना पार्किंगसाठी जागा सोडणे बांधकाम विभागाने बंधनकारक केलेले नाही. याबाबत सामाजिक संघटना आणि प्रसिध्दीमाध्यमांनी जोरदार आवाज उठवला. याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. पार्किंग धोरण ठरवण्याचा निर्णय घेण्यात येऊनही एजन्सीच मिळत नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी संयुक्त सर्वे करून नो पार्किंग आणि वन साईड पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. (प्रतिनिधी)