शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

्रदिव्यात वेग मंदावला : स्थानक स्वच्छतेसह ट्रॅक मेंटेनन्सवर भर

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

डोंबिवली : मध्य रेल्वेने रविवारी ठाणे-कल्याण डाऊन जलदवर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवली होती. त्यामुळे जलदच्या डाऊनचा वेग मंदावला होता. दिवा स्थानकादरम्यान ट्रॅकलगतचे काम करण्यात आले होते. रुळांच्या ट्रॅकमध्ये टाकण्यात येणारी खडी वाहून नेणारी गाडी सकाळपासूनच उभी होती. अभियंत्यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रॅकचे काम करण्यात आले. ट्रॅकची तपासणी, त्यातील खडी बदलणे, फलाटांमध्ये असलेली खडी त्या गाडीत टाकण्यात आली. यासह सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती-पाहणी करण्यात आली. जलदच्या मार्गावर वाहतूक मंदावल्याने त्याचा त्रास लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही झाला. त्यामुळे त्या गाड्यांमधील प्रवाशांना काही वेळ ताटकळावे लागले.

डोंबिवली : मध्य रेल्वेने रविवारी ठाणे-कल्याण डाऊन जलदवर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवली होती. त्यामुळे जलदच्या डाऊनचा वेग मंदावला होता. दिवा स्थानकादरम्यान ट्रॅकलगतचे काम करण्यात आले होते. रुळांच्या ट्रॅकमध्ये टाकण्यात येणारी खडी वाहून नेणारी गाडी सकाळपासूनच उभी होती. अभियंत्यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रॅकचे काम करण्यात आले. ट्रॅकची तपासणी, त्यातील खडी बदलणे, फलाटांमध्ये असलेली खडी त्या गाडीत टाकण्यात आली. यासह सिग्नल यंत्रणेतील दुरुस्ती-पाहणी करण्यात आली. जलदच्या मार्गावर वाहतूक मंदावल्याने त्याचा त्रास लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही झाला. त्यामुळे त्या गाड्यांमधील प्रवाशांना काही वेळ ताटकळावे लागले.
डाऊनच्या जलदवर ब्लॉक असल्याने ठाणे-कल्याणच्या धीम्या स्थानकांमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी होती. दुपारी १२ नंतर मात्र गर्दी कमी झाल्याने प्रशासनावरचा ताण कमी झाला. त्यामुळे स्थानकातील विविध ठिकाणच्या कर्मचार्‍यांनीही स्वच्छतेसह अन्य कामे केल्याचे दिसून आले. दिवा, मुंब्रा आणि डोंबिवलीत स्वच्छतागृहांमधील असुविधा तसेच फलाटातील गळके पत्रे कोठे आहेत, त्याची पाहणी, दुरुस्ती केली. कचरा व्यवस्थापन करताना सफाई कामगारांनी स्थानकातून ज्या ठिकाणाहून पावसाच्या पाण्याचा निचरा होतो, त्या ठिकाणी प्रामुख्याने स्वच्छता केली. तसेच जेथे उपाहारगृहे आहेत, त्या ठिकाणच्या स्वच्छतेवरही भर देण्यात आला. माश्या बसू नयेत, यासाठी जंतुनाशक पावडर मारण्यात आल्याचे निदर्शनास आले.
......................................................................................
* डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक ५ मध्ये पेव्हरब्लॉक बसविण्यात आले आहेत. त्याच्या बाजूला जेथे फरशा बसविल्या आहेत, त्या ठिकाणच्या ज्या फरशा निघाल्या आहेत, त्याची डागडुजी करण्यात आली. त्यासाठी काही लाद्या काढण्यात आल्या, तेथे पुन्हा सिमेंट टाकण्यात आले आणि पुन्हा लाद्या बसविण्यात आल्या.