शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

प्रवासात कुणी तुमचा पाठलाग करतंय असं लक्षात आलं तर?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 15:21 IST

अचानक समोर ठाकलेल्या संकटांना कसं जालं सामोरं?..

ठळक मुद्देअनवस्था प्रसंग आपल्यावर ओढवला तर काय करायचं, याची मानसिक तयारी अगोदरच करून ठेवावी.प्रवासाला गेल्यानंतर आपल्या घराचा पूर्ण पत्ता, त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तिथलाही पत्ता, फोन नंबर्स आपल्याकडे हवेतच.प्रवासात पैसे, बॅग, पर्स लांबवले जाण्याचें प्रकार खूप वेळा होतात. त्यामुळे सारे पैसे कधीच एकाच ठिकाणी ठेऊ नका.

- मयूर पठाडेकारण कुठलंही असो, आपल्याला नियमितपणे बाहेर पडावंच लागतं, प्रवास करावा लागतो. पण कधी कधी अचानक काही प्रॉब्लेम समोर उभे ठाकतात आणि अशावेळी काय करायचं ते आपल्याला सुचेनासं होतं..त्यामुळेच प्रवासाच्या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. विशेषत: तुम्ही एकटे असताना आणि त्यातही महिला असाल तर जास्तच काळजी घेतली पाहिजे. यात ‘महिला’, ‘पुरुष’ असा भेदभाव करण्याचा हेतु नाही, पण तरीही काही गोष्टींबाबत महिलांना अधिकची काळजी घ्यावीच लागते.प्रवासाला गेल्यानंतर काय काळजी घ्याल?१- खरं तर प्रवासाला गेल्यानंतर घ्यावयाच्या काळजीपेक्षा ती काळजी अगोदरच घेतली पाहिजे आणि समजा दुर्दैवानं काही अनवस्था प्रसंग आपल्यावर ओढवला तर काय करायचं, याची मानसिक तयारीही आपण अगोदरच करून ठेवलेली असली, तर ऐनवेळी मग एकदम डगमगायला होत नाही. हाता पाय न गाळता योग्य तो निर्णय आपल्याला घेता येतो.२- प्रवासाला गेल्यानंतर आपल्या घराचा पूर्ण पत्ता, महत्त्वाचे फोन नंबर्स आपल्याजवळ आणि जिथे आपण राहाणार आहोत, तिथेही असायला हवा. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तिथला पत्ता, फोन नंबर्सही आपल्याकडे हवेतच. तेही डायरीत नाहीतर एखाद्या कागदावर हाताने लिहिलेले. फोनची बॅटरी केव्हाही दगा देऊ शकते.३- बाहेर तुम्ही एकट्याने कुठे जात असताना, त्यातही ती वेळ रात्रीची असताना तुमचा कुणी पाठलाग करतं आहे, असं लक्षात आल्यावर धावतपळत आपलं मुक्कामाचं ठिकाण गाठू नका. त्याऐवजी रस्त्यावरच जर एखादं हॉटेल, घर दिसलं, तर तिथे आधी जा. त्यांना तुमची अडचण सांगा. तिथून मदत मिळू शकते.४- प्रवासात पैसे, बॅग, पर्स लांबवले जाण्याचें प्रकार खूप वेळा होतात. त्यामुळे सारे पैसे कधीच एकाच ठिकाणी ठेऊ नका. ते विखरून ठेवा. म्हणजे काही खिशात, काही बॅगमध्ये, काही पर्समध्ये.. अशा पद्धतीनं. म्हणजे दुर्दैवानं काही झालंच तर आपण अगदीच कफल्लक होणार नाही..प्रवासात अशा काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. त्यासंदर्भात आणखी काही माहिती पुढच्या भागात..