शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

इतिहासाचं वैभव अनुभवायचं असेल तर हम्पीला जायलाच हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 18:34 IST

गुलाबी थंडीत, सोनेरी सूर्यप्रकाशामध्ये इतिहासाचं हे वैभव शांतपणे डोळ्यांत साठवण्यासारखा आनंद दुसरा नाही. त्यामुळे हंपीला तीन ते चार दिवसांची एक मस्त ट्रीप लगेचच प्लॅन करु न टाका.

ठळक मुद्दे* हम्पीला अनेक मंदिरं पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं मंदिरं असली तरी तुम्ही अजिबात कंटाळत नाही. कारण इथलं प्रत्येक मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.* इथलं रथ मंदिरं तर एका विशाल दगडातून कोरु न काढलेलं आहे. आरबीआयनं 50 रूपयांची जी नवीन नोट छापली आहे, त्यावर याच रथमंदिराचं चित्र आहे. हे मंदिर तब्बल 600 वर्षांपूर्वी बांधलं गेलं आहे.* विठाला मंदिर तर एकदम अद्भुत आहे. हे मंदिर 56 स्तंभांवर उभं आहे आणि या स्तभांवर आघात केल्यावर त्यातून चक्क मधुर संगीत ऐकायला मिळतं.

 

- अमृता कदमसोशल मीडियावर सध्या सोनम कपूरचं नवीन फोटोशूट चर्चेत आहे. हंपीतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या पार्श्व्भूमीवर केलेलं हे फोटोशूट सोनमच्या रूपाला चारचाँद लावत आहे.

हम्पी. एकेकाळचं हे वैभवशाली नगर आजही आपल्या भूतकाळाच्या खुणा अभिमानानं बाळगून आहे. त्यामुळेच या लोकेशन्सची निवड सोनमनं करावी यात काहीच आश्चर्य नाही. सोनमप्रमाणेच तुम्हीही हंपीची एक मस्त ट्रीप प्लॅन करु शकता. केवळ फोटोसेशनसाठी नाही तर या शहराला अधिकाधिक एक्सप्लोअर करण्यासाठी.

आज कर्नाटकामध्ये असणारं हे शहर मध्ययुगीन काळात विजयनगर साम्राज्याची राजधानी होतं. तुंगभद्रा नदीच्या काठी हे शहर वसलं आहे. आज हंपीला काय काय पाहता येतं, असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल. तर इथे तुम्हाला अनेक मंदिरं पाहायला मिळतात. मोठ्या संख्येनं मंदिरं असली तरी तुम्ही अजिबात कंटाळत नाही. कारण इथलं प्रत्येक मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे.

या शहराच्या प्रवेशद्वारावरच हजारा राम मंदिर आहे. त्यानंतर आत गेल्यावर अद्भुत मंदिरं पाहायला मिळतात. अर्थात, यातली बरीच मंदिरं ही आज भग्नावस्थेत आहेत. विजयनगर साम्राज्याचा इतर राज्यांसोबतचा संघर्ष आणि नंतरच्या काळातली परकीय आक्र मणं हे त्यामागचं एक कारण आहे. पण भग्नावस्थेत असली तरी या मंदिरांच्या स्थापत्यातलं सौंदर्य लपून राहात नाही.

 

इथलं रथ मंदिरं तर एका विशाल दगडातून कोरु न काढलेलं आहे. आरबीआयनं 50 रूपयांची जी नवीन नोट छापली आहे, त्यावर याच रथमंदिराचं चित्र आहे. हे मंदिर तब्बल 600 वर्षांपूर्वी बांधलं गेलं आहे. यावरु नही विजयनगरच्या कला-स्थापत्याच्या वैभवाची कल्पना यावी.

 

विठाला मंदिर तर त्याहूनही अद्भुत आहे. हे मंदिर 56 स्तंभांवर उभं आहे आणि या स्तभांवर आघात केल्यावर त्यातून चक्क मधुर संगीत ऐकायला मिळतं. याच मंदिराच्या पूर्वेकडे एक शिलारथ आहे. या रथाची चाकं चक्क दगडाची आहेत. आणि या दगडी चाकांवर हा रथ चालायचाही. विजयविठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, हजारराम मंदिरही पर्यटकांना आकर्षून घेतात.

 

मंदिरांबरोबरच महाल, त्याकाळातले तहखाने, तलाव, पुष्करणीही हंपीमध्ये पाहायला मिळतात. या अद्भुत सांस्कृतिक वारशामुळेच युनेस्कोनं जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये हंपीचा समावेश केला आहे.हंपीला परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात. आवर्जून इथे येणा-या भारतीय पर्यटकांची संख्या मात्र कमी आहे. हंपीला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटीही उत्तम आहे. परदेशी पर्यटकांमुळं इथे मोजकीच आणि महागडी हॉटेल्स आहेत. पण तुमच्या-आमच्या खिशाला परवडेल अशी होम स्टेची सुविधाही उपलब्ध असल्यामुळे बजेटची फार चिंता करु नका. गुलाबी थंडीत, सोनेरी सूर्यप्रकाशामध्ये इतिहासाचं हे वैभव शांतपणे डोळ्यांत साठवण्यासारखा आनंद दुसरा नाही. त्यामुळे हंपीला तीन ते चार दिवसांची एक मस्त ट्रीप लगेचच प्लॅन करु न टाका. आणि हो, सोनमप्रमाणे फोटोग्राफर नसला तरी हरकत नाही. आपली सेल्फी स्टीक आहेच ना! आपणच आपलं फोटोसेशनही करून टाकायचं.