शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर खड्डे वाहतुकीस अडथळा : एपीएमसीसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST

नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रवेशद्वारावर पावसाचे पाणीही साचून राहत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रवेशद्वारावर पावसाचे पाणीही साचून राहत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ आल्यानंतर अनेक रखडलेली कामे सुरू झाली आहेत. परंतु यानंतरही अनेक समस्या अद्याप कायम आहेत. मसाला, भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. मसाला मार्केटमध्ये पोलीस चौकीकडील आवक गेटवर मोठा खड्डा पडला असून तो बुजविला जात नसल्यामुळे वाहनांना ये - जा करता येत नाही. भाजी मार्केटकडील गेटवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. हा रस्ता महापालिकेच्या अखत्यारित येत असून पालिका प्रशासनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. महत्त्वाच्या मार्केटमधील या समस्यांमुळे वाहनधारकांसह व्यापारी व कामगारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारांचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहेत. दोन्ही मार्केटमध्ये अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. परंतु काम करताना बाहेरील रस्त्याच्या पातळीशी समांतर केले नसल्यामुळे पावसाचे पाणी गेटवर साचून राहत आहे. पाणी गटारात जाण्यासाठीची सोयच करण्यात आली नाही. यामुळेही गैरसोय होऊ लागली आहे. मार्केटमध्ये प्रवेश करतानाच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी वाहतूकदारांनी केली आहे.

फोटो मेल केले आहेत.