शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

टॅक्सी संपाला मुंबईत संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

खासगी टॅक्सी सेवेवर बंदी घालण्याची स्वाभिमानची मागणी १५0 टॅक्सी फोडल्याचा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा आरोपआता १७ जून रोजी रिक्षा चालक-मालकांचा बंदमुंबई - मोबाईल ॲप्सवर चालणार्‍या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे सोमवारी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शहर आणि उपनगरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये ...


खासगी टॅक्सी सेवेवर बंदी घालण्याची स्वाभिमानची मागणी
१५0 टॅक्सी फोडल्याचा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा आरोप
आता १७ जून रोजी रिक्षा चालक-मालकांचा बंद
मुंबई - मोबाईल ॲप्सवर चालणार्‍या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे सोमवारी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शहर आणि उपनगरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी टॅक्सी चालकांवर जबरदस्ती केली जात होती. त्यासाठी तब्बल १५0 टक्सी फोडल्याचा आरोप मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून स्वाभिमानवर करण्यात आला आहे. यात रिक्षा चालक मात्र बंदमध्ये सामिल झाले नाही. या बंदनंतर आता १७ जून रोजी मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून बंद पुकारण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मोबाईल ॲपवर धावणार्‍या खासगी टॅक्सी मोठ्या प्रमाणात असून त्यांची सरकारदरबारी नोंद नसतानाही त्या धावत आहेत. या खासगी सेवा काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणे प्रवाशांकडून किलोमीटरच्या दरात भाडे आकारत असून त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे खासगी टॅक्सी सेवांना विरोध करत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी सर्वच रिक्षा-टॅक्सी युनियनकडून वेळोवेळी सरकारकडे करण्यात आली आहे. त्यासाठी स्वाभिमान टॅक्सी रिक्षा-युनियनकडून सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. यात दहा हजारपेक्षा टॅक्सी-रिक्षा चालक सामिल होतील, असा दावा युनियनचे अध्यक्ष के.के.तिवारी यांनी केला होता. मात्र टॅक्सी वगळता रिक्षा या संपात सहभागी झाल्याच नसल्याचे दिसून आले. स्वाभिमानकडून रेल्वे स्थानकांबाहेरील टॅक्सी सेवांवर लक्ष केंद्रीत करत त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता. मुंबई सेन्ट्रल, सीएसटी, दादर, भायखळा या स्थानकांबाहेर टॅक्सी मिळवताना प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडत होती. प्रिपेड टॅक्सी सेवाही उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले.
............................................
याबाबत मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए.एल.क्वाड्रोस यांनी स्वाभिमानकडून पुकारण्यात आलेल्या बंदचा तीव्र निषेध केला आहे. या बंदमध्ये सामिल होण्यासाठी टॅक्सी चालकांवर जबरदस्ती करण्यात आली. त्यासाठी वान्द्रेतील खेरवाडी, दादर, वडाळा, माहीम, दादर, वरळी, भायखळा या भागात मिळून तब्बल १५0 टॅक्सी स्वाभिमान संघटनेकडून फोडण्यात आल्या.

स्वाभिमान टॅक्सी-रिक्क्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, या खासगी टॅक्सी सेवांचे वर्चस्व वाढले असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना फटका बसत आहे. त्यासाठीच हा बंद पुकारण्यात आला होता. राज्य सरकारकडूनही याविषयी मदत मिळत नसून पुढे बंदची धार तीव्र करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी दिला. तर क्वाड्रोस यांनी केलेले आरोप पुरावे घेवून करावेत, असेही राणे यांनी सांगितले.
....................................

१७ जूनला रिक्षा बंद
ओला, उबेर सारख्या खासगी टॅक्सी कंपन्या अनधिकृत व्यवसाय करत असून त्याचा काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यासाठी खासगी टॅक्सींवर बंदी आणावी यासाह अन्य मागण्यांसाठी १७ जून रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. हा संप मुंबई,ठाणे, कल्याण-डोंेबिवलीसह, वसई-विरार, नालासोपारा,अर्नाळा भागात होणार असल्याने स्थानिकांचे हाल होऊ नये यासाठी एसटीकडून १00 बसेसची सोय करण्यात आली आहे.
.......................................