शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटून आठवडा झाल्यानंतर दुरूस्तीस सुरुवात

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्‍या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. परिसरात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्यात टाळाटाळ केल्याचे आणि त्यामुळेच विलंब झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्‍या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. परिसरात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्यात टाळाटाळ केल्याचे आणि त्यामुळेच विलंब झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
ही भूमिगत जलवाहिनी टेमघरहून आली आहे. ४ सप्टेंबरला ती फुटल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आले. परंतु हा परिसर द्रुतगती मार्गावर असल्याने येथे काम करायचे झाल्यास त्याला ठाणे वाहतूक शाखेची परवानगी घ्यावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार या विभागाने त्यांच्याकडे परवानगी मागितली असता हा रस्ता वाहतुकीचा असल्याने ज्या दिवशी कमी वाहतूक असेल त्याच दोन दिवसांत या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घ्या असे त्यांनी सांगितले. त्यानुसार या कामासाठी १२ आणि १३ सप्टेंबर हे दोन दिवस निश्चित करण्यात आले होते. वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, हा रस्ता वर्दळीचा असल्याने आम्ही ज्या दिवशी वाहतूक कमी असेल त्यादिवशी या जलवाहिनीचे काम हाती घ्या असे ठाणे महापालिकेला सांगितले आहे. (प्रतिनिधी) - फोटो आहेत.