शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘झट की पट पासपोर्ट’ साठी या 6 गोष्टी करा. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 19:53 IST

आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयांचे खेटे घालून वेगवेगळी कागदपत्रं जमा करण्याची गरज उरलेली नाहीये. सरकार दिवसेंदिवस पासपोर्ट बनवण्याची प्रक्रि या सुलभ करत आहे. पण तुम्हाला ती माहिती नसेल तर तुमचा वेळही वाया जाईल आणि एजंटमार्फत काम करून घेणार असाल तर पैसेही.

ठळक मुद्दे* पासपोर्टसाठी अर्जदाराची जन्मतारीख असलेला शाळा सोडल्याचा दाखला किंवा मॅट्रिक्युलेशन सिर्टिफिकेट किंवा पॅन कार्ड, इ-आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि एलआयसी पॉलिसी बॉन्ड तुम्ही पासपोर्टसोबतच्या अर्जासोबत जोडू शकता.* जर तुम्ही ‘तात्काल’मध्ये अर्ज करत असाल तर तुमची अर्ज करण्याची प्रक्रि या थोडीशी बदलते.* पासपोर्टची फीसुद्धा आॅनलाइन भरता येते.

- अमृता कदमपरदेशी प्रवासाला निघताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पासपोर्ट. पहिल्यांदाच परदेश प्रवास करणार्याची सुरूवात पासपोर्ट बनवण्यापासूनच होते. म्हणूनच पासपोर्ट कसा बनवायचा यासंबंधीची माहिती असणं गरजेचं आहे. आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयांचे खेटे घालून वेगवेगळी कागदपत्रं जमा करण्याची गरज उरलेली नाहीये. सरकार दिवसेंदिवस पासपोर्ट बनवण्याची प्रक्रि या सुलभ करत आहे. पण तुम्हाला ती माहिती नसेल तर तुमचा वेळही वाया जाईल आणि एजंटमार्फत काम करून घेणार असाल तर पैसेही.सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पासपोर्ट बनवण्यासाठी आता तुम्हाला जन्माच्या दाखल्याची आवश्यकता नाही. 1980च्या पासपोर्ट नियमांनुसार 26 जानेवारी 1989 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना पासपोर्टसाठी आपला जन्माचा दाखला सादर करावा लागायचा. पण नुकतीच केंद्र सरकारनं जन्म दाखल्यावर काट मारली आहे. नियमांत बदल करण्यासाठी संसदेसमोरही माहिती दिली गेली आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार पॅन कार्ड किंवा आधार कार्ड जन्मतारखेच्या खातरजम्यासाठी वापरले जाऊ शकतात. म्हणूनच यापुढे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हेदेखील तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातील.मग पासपोर्टसाठी नेमकं काय काय लागू शकतं? अर्जदाराची जन्मतारीख असलेला शाळा सोडल्याचा दाखला किंवा मॅट्रिक्युलेशन सिर्टिफिकेट किंवा पॅन कार्ड, इ-आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि एलआयसी पॉलिसी बॉन्ड तुम्ही पासपोर्टसोबतच्या अर्जासोबत जोडू शकता. सरकारी कर्मचारी आता आपली सर्व्हिस रेकॉर्ड किंवा पेन्शन रेकॉर्डशी संबंधित कागदपत्रंही देऊ शकतात.सर्वांत महत्त्वाचं तुम्ही पासपोर्टसाठी आॅनलाइन अप्लाय करु शकता. आणि अवघ्या सात ते पंधरा दिवसांत सर्व प्रक्रि या पूर्ण होवून तुमच्या हातात तुमचा पासपोर्ट येतो.

झट की पट पासपोर्टसाठी1. सर्वांत पहिल्यांदा तुम्हाला www.passport.gov.in वर जाऊन लॉग इन करावं लागेल. तुम्ही पहिल्यांदाच ही प्रक्रि या पार पाडत असाल तर डाव्या कोपर्यातल्या New User? Register Now या लाल बटनावर क्लिक करा. सर्व सूचनांचं पालन करा, आवश्यक ती माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन करा.2. रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. लॉग इन केल्यावर Apply for Fresh Passport/Re-issue of Passportया सूचनेवर क्लिक करा. तुम्हाला तिथे दोन पर्याय मिळतील.

1. तुम्ही अर्ज डाऊनलोड करून तो भरा आणि नंतर तो वेबसाइटवर पुन्हा अपलोड करा.

2. तुम्ही तुमचा अर्ज आॅनलाइनही भरु शकता.

अर्ज भरताना सगळी माहिती हाताशी हवीच असं काही नाही. तुम्ही आठवेल तेवढी माहिती भरून तो अर्ज सेव्ह करु शकता. आणि नंतर उरलेली माहिती भरता येते. आॅनलाईन फॉर्म भरत असताना एक बॅक-अप म्हणून फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून ठेवू शकता.

3) जर तुम्ही ‘तात्काल’मध्ये अर्ज करत असाल तर तुमची अर्ज करण्याची प्रक्रि या थोडीशी बदलते. तत्काळची प्रक्रि या वेगवान असल्यामुळे पासपोर्ट तुमच्या हातात येईपर्यंत पोलिस व्हेरिफिकेशन होत नाही. पण त्यासाठी तुम्हाला Annexure F सबमिट करावं लागतं. हे Annexure Fम्हणजे लिखित दस्तावेज असतात. ज्यामध्ये तुम्ही हे लिहून देत असता की गेल्या वर्षभरापासून तुम्ही नमूद केलेल्या पत्त्यावर राहात आहात. केंद्र सरकारच्या अधिकार्यामार्फत त्याची पडताळणी होते. त्यावर त्याची सही आणि शिक्का लागतो. पण तुमची जर संबंधित अधिकार्याशी वैयक्तिक ओळख असेल किंवा कोणाच्या ओळखीनं तुम्ही जात असाल तरच हे काम चटकन होतं. कारण कोणताही अधिकारी अनोळखी व्यक्तीसाठी आपली नोकरी धोक्यात घालेल बरं!

4 ) जेव्हा अर्ज भरण्याची प्रक्रि या पूर्ण होईल तेन्हा तुम्हाला तुमचं ओळखपत्र, रहिवासाचा पुरावा,Annexure F  (जर तत्काळमध्ये अर्ज करत असाल तर) आणि इतर नमूद केलेली कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करावी लागतात.

5) त्यानंतरची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्टसाठी फी भरणं आणि अधिकार्याची भेटीची वेळ घेणं. तुम्हाला पासपोर्टची फीसुद्धा आॅनलाइन भरता येते. पैसे भरल्यानंतर तुम्हाला तुमची भेट ठरवण्यासंबंधातला पर्याय येतो. तुमच्या सोयीनं पासपोर्ट सेवा केंद्र निवडा आणि तारीख आणि वेळही ठरवून घ्या. त्यानंतर तुमची अपॉइंटमेंट निश्चित करणारा एक एसएमएस तुम्हाला येतो. तसेच इमेलद्वारे एक पावतीही येते. त्यामुळे तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रात ठरलेल्या दिवशी आणि वेळी प्रवेश मिळतो.

6) जेव्हा तुम्ही अधिकार्याना भेटायला जाल तेव्हा तुमच्या सोबत सगळ्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी ठेवा. शिवाय तुमच्या कागदपत्रांचे एकापेक्षा जास्त सेट बनवून ठेवा. कारण ऐनवेळी तुम्हाला एकापेक्षा जास्त कॉपी मागितल्या जाऊ शकतात. शिवाय मूळ कागदपत्रंही न्यायला विसरु नका. त्यानंतर व्हेरिफिकेशनचे काही राउण्ड पार पाडल्यानंतर तुमची पासपोर्टसंदर्भातली सर्व प्रक्रि या पूर्ण होते.पासपोर्ट बनवण्याची प्रक्रि या इतकी सुलभ आहे. फक्त तुम्हाला त्यासंबंधीची योग्य माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणाच्याही मदतीशिवाय घरबसल्या तुमचा पासपोर्ट बनवता येईल.