शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडीसी’कडून कोट्यवधींच्या रकमेवर जि.प.ला व्याज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:59 IST

सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा : ठेवी अन्य बँकेत ठेवण्याची सदस्यांनी केली मागणी

सुरेश लोखंडे 

ठाणे : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसी) बँकेत ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागांची खाती आहेत. त्यात विविध योजनांचा करोडो रुपयांचा निधी जमा असतो. मात्र, या रकमेवर या बँकेकडून व्याज मिळत नसल्याचा आरोप सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी केला. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा करोडो रुपयांचा निधी टीडीसी बँकेत जमा केला जातो. यासाठी शेकडो खाती या बँकेत जिल्हा परिषदेने सुरू केली आहेत. मात्र, या खात्यांतील रकमेवर बँकेकडून व्याज केले जात नाही. अन्य बँकांमधील खात्यांमधील रकमेवर मात्र चार टक्के वार्षिक व्याजदर आकारून ती रक्कम खात्यात दरवर्षी जमा होत असल्याचे घरत यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. या मुद्यास अनुसरून अन्यही सदस्यांनी त्यांना पाठिंबा देऊन सभागृह डोक्यावर घेतले.

बँकेतील खात्यांवर करोडो रुपये निधी जमा असतो. विविध योजनांचा हा निधी खात्यात पडून राहत असतो. त्या रकमेचा वापर बँक करते. मात्र, त्याच्या बदल्यात वार्षिक चार ते साडेचार टक्के व्याज देणे अपेक्षित असल्याच्या चर्चेवर सदस्य गोकूळ नाईक, कैलास जाधव यांच्यासह अन्यही सदस्यांनी सहभाग घेतला. मात्र, टीडीसी बँकेकडून एक टक्का जादा व्याज दर दिला जात असल्याचे उपाध्यक्ष व टीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक सुभाष पवार यांनी स्पष्ट केले. याविषयी अधिक चौकशी लवकरच करून चौकशी करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.ठेवी अन्य बँकेत वळत्या करामुरबाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचे आठ लाख रुपये टीडीसीसी बँकेत काही वर्षांपासून जमा आहेत. त्यात आता किती जमा झाले, अशी माहिती घेतली असता त्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसल्याचे निदर्शनात आले. याविषयी बँकेने लेखी उत्तरात केवळ सेवा देत असल्याचे नमूद केल्याचे घरत यांनी सभागृहात स्पष्ट केले. यास अनुसरून बँक व्याज देत नसेल, तर त्यातील खाते अन्य बँकांमध्ये वळते करून व्याजाचा लाभ जिल्हा परिषदेला करून देण्याची अपेक्षा अन्य सदस्यांनीदेखील लावून धरली. यावर प्रशासनाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे सदस्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणे