शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या उफरट्या कारभराचा फटका

By admin | Updated: November 17, 2016 07:11 IST

शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम दीर्घकाळ रखडल्याने आधीच सर्वत्र धुळीचे साम्राज्य परसले आहे.

डोंबिवली : शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम दीर्घकाळ रखडल्याने आधीच सर्वत्र धुळीचे साम्राज्य परसले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने धूर आणि आवाजाच्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता काँक्रिटच्या रस्त्यांशेजारचे रस्ते पुन्हा खोदण्यास सुरूवात केल्याने काम झालेल्या रस्त्यांतही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणचे फुटपाथ तोडून तेथे गटारे बांधण्याचा द्रविडी प्राणायाम सुरू आहे. मानपाडा रोडनजीक टाटा पॉवरलाइनजवळील रस्त्यानजीकचे फुटपाथ नव्याने खोदले आहेत. त्यामुळे नागरिकांना चार रस्त्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे जिकीरीचे झाले आहे. चारचाकींसह दुचाकी आणि मोठ्या वाहनांमधून वाट काढतांना अडथळयाची शर्यत पार पाडावी लागते आहे. ज्येष्ठांसह विद्यार्थ्यांचाही त्याचा त्रास होत असून वाहनचालकही त्रस्त आहेत. आधी जेथे सीसी रोडचे काम केले त्याचवेळी गटारीची कामे का केली गेली नाहीत, असा सवाल संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना विचारला. पण ते निरुत्तर झाले. पुढील तीन महिने ही कामे अशीच सुरू राहणार आहेत. (प्रतिनिधी)