शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

महानगर गॅस पाइपलाइनचे काम हुकूमशाही पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:02 IST

गेले अनेक महिने खालापूरवरून कर्जत रस्त्यालगत महानगर गॅस पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कर्जत : गेले अनेक महिने खालापूरवरून कर्जत रस्त्यालगत महानगर गॅस पाइपलाइनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  एमएसआरडीसीने यामध्ये कोणत्याही प्रकारे शेतकरी व जागामालकांना पूर्वसूचना न देता हुकूमशाही पद्धतीने काम करीत असल्याची टीका माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी  सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून आता गॅस पाइपलाइनची चौकशी झाली पाहिजे आणि शेतकरीवर्गांना न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका माजी आमदार लाड यांनी घेतली आहे. 

माजी आमदार सुरेश लाड यांनी गॅस लाईनच्या ठिकाणी जावून पंछि गुप्ता,  ताटीपल्ली  मोहनराज, बाळकृष्ण ठोंबरे, प्रकाश हजारे, अमोघ कुलकर्णी आदी शेतकऱ्यांशी संवाद साधून एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीने मालकीची जागा नसतानाही कोणत्या अनुषंगाने गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच  या रस्त्याकरिता जमीन संपादन करणे गरजेचे होते ते केले नाही.

अगोदर रस्ता एमएमआरडीएने केला होता. त्याअगोदर १९८५ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. त्यावेळीही भूसंपादन झाले नाही आणि आता राष्ट्रीय हायवे म्हणून शहापूर-मुरबाड कर्जतवरून खोपोलीकडे जाणाऱ्या मार्गासाठी भूसंपादन केले नाही.  शेतकऱ्यांनी रस्त्येच्या कडेला जमिनी ठेवल्या. कर्जबाजारी होऊन व्याज भरून ते फेडले एवढे होऊनही जमिनी टिकविल्या. कारण वेळप्रसंगी त्या जमिनीवर उद्योग व्यवसाय सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल.

मात्र, गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी दिली, पण त्यावर किती मीटर लांब बांधकाम करावे लागेल याची कल्पना, सूचना दिली नाही. एकूणच मनमानी कारभार सुरू आहे. हे रोखले पाहिजे यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि एमएसआरडीचे मोपलवार यांना अर्ज देऊन काम थांबविले असल्याचे सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे