शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

भार्इंदरमध्ये नाल्याचे काम रखडले

By admin | Updated: June 10, 2017 01:10 IST

भार्इंदर पूर्वेच्या जेसल पार्क खाडीकिनारी जाणाऱ्या रेल्वे समांतर नाल्याचे काम रखडल्याने पहिल्याच पावसात भार्इंदर पूर्व

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या जेसल पार्क खाडीकिनारी जाणाऱ्या रेल्वे समांतर नाल्याचे काम रखडल्याने पहिल्याच पावसात भार्इंदर पूर्व रेल्वेस्थानकाजवळच्या परिसरात पाणी साचले. अखेर, नाल्याचे काम अर्धवट असतानाच तो खुला करून पाण्याचा प्रवाह खुला करण्यात आला. विशेष म्हणजे पाऊस जोरात असताना पाणीउपशासाठी केवळ एकच पंप सुरू होता. यामुळे नागरिक संतापले आहेत. मीरा-भार्इंदर महापालिकेने जेसल पार्क सब वेसाठी येथील रेल्वे समांतर नाला तोडला. सब वेचे काम रखडल्याने नाल्याचे कामही बारगळले, जेणेकरून सांडपाणी ओस्तवाल शॉपिंग सेंटरजवळ अडवून तेथून पंपाने सब वेच्या पलीकडे सोडले जात होते. परंतु, पावसाळ्यात पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्यापूर्वी नाल्याचे काम पूर्ण न केल्यास भार्इंदर पूर्वेतील दळवी चाळ, वसई जनता बँक परिसर, बाळाराम पाटील मार्ग आदी भाग पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील, नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनी पालिकेकडे या नाल्याचे काम पूर्ण करण्यासाठी तगादा लावला होता. जेसल पार्क, राहुल पार्क आदी भागांतील हजारो नागरिकांना येजा करण्यासाठीचा हा मुख्य मार्ग आहे. परंतु, सब वे व नाल्याच्या कामामुळे अनेक महिन्यांपासून नागरिकांचा वाहन तसेच पायी येजा करण्याचा मार्गच बंद झाला आहे. वीजपुरवठा करणाऱ्या केबल आदी उघड्यावरच टाकल्या आहेत. चालणेही धोक्याचे झाले आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिक आधीच मेटाकुटीला आले आहेत. पालिकेच्या ढिसाळपणामुळे पावसाळा सुरू झाला, तरी नाल्याचे काम अर्धवटच झालेले आहे. बुधवारी दुपारीही पाटील यांनी नाल्याच्या कामाची पाहणी करून निदान एका बाजूने तरी नाला खुला करा, अशी मागणी केली होती. परंतु, काम अर्धवटच असताना बुधवारी रात्री पावसाने दमदार सुरुवात केल्याने दळवी चाळ, वसई जनता बँक परिसर, बाळाराम पाटील मार्ग आदी ठिकाणी पाणी साचले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, पहाटे ४ च्या सुमारास नाल्याच्या ठिकाणी पाहणी केली असता पाणीउपसा करणारा एकच पंप सुरू होता. अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यावर आणखी तीन पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर, पाणी ओसरले, असे पाटील यांनी सांगितले. पावसाला सुरुवात झाल्याने अखेर अर्धवट अवस्थेतील नाला पाण्यासाठी खुला करण्यात आला. परंतु, तो वरून खुलाच असून आजूबाजूलाही खोदकाम केले आहे.