शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय ५०‌ टक्के आरक्षणासाठी महिलांनी छेडले ठाण्यात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 13:12 IST

देशभरातील राज्यांमध्ये भारतीय महिला फेडरेशनसह विविध महिला संघटनांनी एकत्र येऊन आज देशभर आंदोलन छेडले आहे.

ठाणे: महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या आरक्षणाला 12 सप्टेंबरला 25 वर्षे पूर्ण झाले आहे. परंतु महिलाना लोकसभेसह विधीमंडळात आणि सर्वच क्षेत्रत 50 टक्के आरक्षण लागू करा, या मागणीसाठी येथील भारतीय महिला फेडरेशनच्या नेतृत्वाखाली महिला रविवारी ठाणे येथील चरईत आंदोलन छेडले.

देशभरातील राज्यांमध्ये भारतीय महिला फेडरेशनसह विविध महिला संघटनांनी एकत्र येऊन आज देशभर आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ठाण्यातही महिलांनी एकत्र येऊन या आंदोलनात सहभाग घेऊन निदर्शने केली, असे भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा निर्मला पवार यांनी लोकमतला सांगितले. लोकसभेत व विधान सभेतही महिलांच्या 50 टक्के आरक्षणाची मागणी या आंदोलनकर्त्यां महिलांनी करुन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यामुळे येथील राजकीय वर्तुळात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यसभेत २०१० ला मंजूर झालेल्या या महिला आरक्षण विधेयकाला रविवारी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे. राज्यसभेत मंजूर झालेले हे बील अजूनही  लोकसभेत मंजूर झाले नाही. स्वातंत्र्यानंतरही भारतामध्ये महिलांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेचे हक्क देताना संसदेत आणि संसदेबाहेर मोठय़ा प्रमाणावर विरोधहोत असल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बील मांडले. त्याही वेळेला पितृसत्ताक व्यवस्थेच्या समर्थकांनी या हिंदू कोड बिलास विरोध केल्याची आठवणही पवार यांनी याप्रसंगी करून दिली.12 सप्टेंबर 1996 रोजी देवेगौडा सरकारने सादर केलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मात्र मंजूर होऊ शकले नाही. खासदार कॉ. गीता मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या या विधेयकाला 1999, 2002 लाही सादर केले होते. मात्र फेब्रुवारी 2010 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने हे विधेयक मंजूर केले होते. परंतु ते लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. त्यास विरोध करण्यासह महिला 50 टक्के आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत मिळावे यासाठी आम्ही महिला आंदोलन छेडत असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे