शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रायोजकाविनाच

By admin | Updated: August 13, 2015 23:17 IST

दोन वेळा निविदेला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर यंदाची २६ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रायोजकाविनाच घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठाणे : दोन वेळा निविदेला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर यंदाची २६ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा प्रायोजकाविनाच घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, येत्या २३ आॅगस्ट रोजी ही स्पर्धा महापालिका मुख्यालयापासून सुरू होणार असून मुख्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुरुष आणि महिला गटांसाठी यंदा प्रथमच टाइम टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. तसेच २१, १५ आणि १० किमीची स्पर्धाही यंदा प्रथमच सकाळी ६.३० वाजता सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही स्पर्धा निर्धाराने धावू या... ठाणे स्वच्छ व हिरवेगार करू या... या घोषवाक्याखाली आयोजित केली असून त्यात ३५ हजार स्पर्धक धावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येत्या २३ आॅगस्ट रोजी सकाळी मुख्य स्पर्धा ६.३० वाजता सुरू होणार असून उर्वरित ७ गटांच्या स्पर्धा ८ वाजता सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आॅनलाइन सर्टिफिकेट देणार असून शेवटपर्यंत धावणाऱ्या स्पर्धकाला मेडल मिळणार आहे.