शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वसईतून एसटी होणार बंद

By admin | Updated: September 17, 2016 01:52 IST

एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपे , वसईएसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातून आता लाल डबा गायब होण्याच्या मार्गावर आहे.वसई तालुक्यातील अर्नाळा, वसई आणि नालासोपारा एस.टी.आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगोला, लातूर, पुणे, अंमळनेर, संगमनेर, कराड इचलकंरजी आदी लांब पल्ल्याच्या गाड्या १ जुलैपासून बंद केल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धावत असलेल्या या गाड्या दररोज पन्नास हजारांहून अधिक रुपयांचा गल्ला जयवंत होत्या. थेट प्रवाशांपेक्षा आपल्या गंतव्य स्थानापासून हायवे, चिंचोटी , कामणफाटा, ससुनवघर, घोडबंदर, ठाणे, पनवेल,स्वारगेट अशा छोट्या-छोट्या पल्ल्यातील प्रवाशी घेवून हजारोंचा गल्ला जमवत होत्या. लांब पल्ल्यांतील प्रवाशी कमी असल्यामुळे कागदावर त्यांची संख्या कमी दिसत असली तरी छोट्या पल्ल्यांच्या प्रवाशांमुळे एस.टी.ला जास्त कमाई होत होती. त्यानंतरही या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. टप्पा वाहतुकीपेक्षा थेट प्रवासी असतील तर त्या सुरु ठेवण्यात याव्यात.असे एस.टी.ला परिवहन मंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता सांगोला, अंमळनेर, संगमनेर, लातूर, पुणे या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर विभागातून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी यांनी केला आहे. त्यातच नालासोपारा आगारातील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय एस.टी.महामडळाने घेतला आहे. वसई आगारातून ९ मार्गावर शहर वाहतूक सुरु असून त्यातील गिरीज, रानगाव भुईगाव या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरीत मार्गावरील वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहेत. नालासोपारा एसटी आगारातून सध्या एकूण १६ मार्गांवर शहर बस वाहतूक होत आहे. या सर्व बसेस पश्चिम पट्ट्यात धावणाऱ्या आहेत. आता यातील पाच मार्गावरील बस वाहतूक बंद केली जाणार आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी एस.टी.चा गाशा लवकरच गुंडाळण्यात येण्यार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बस बंद होत असल्यामुळे एस.टी.कामगार धास्तावले असून,तसे झाल्यास पोटाची खळगी भरण्यासाठी या कामगारांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागणार आहे. त्यामुळे एस.ट्या.वाचवण्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याची चर्चा सोशल मीडियावरून केली जात आहे.