शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानांचा परवाना निलंबित होणार ?

By admin | Updated: April 1, 2017 05:53 IST

मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल महिन्यात साखरपुरवठा करण्यासाठी सुमारे ७५० क्विंटल

ठाणे : मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल महिन्यात साखरपुरवठा करण्यासाठी सुमारे ७५० क्विंटल साखरेच्या कोट्यास मंजुरी मिळालेली आहे. तिची वेळीच उचल करून रेशनिंग दुकानदारांनी मुदतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जारी केले आहेत. मात्र, दिलेल्या मुदतीमध्ये नियंत्रित साखरेची उचल न करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करून त्याविषयी अहवाल पाठवण्याची जबाबदारी संबंधित परिमंडळ कार्यालयाच्या उपनियंत्रकांवर सोपवली आहे. यामुळे रेशनिंग दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.रेशनिंग दुकानांवर होणाऱ्या या साखरेच्या पुरवठ्यातून दारिद्रयरेषेखालील शिधापत्रिकाधारकामधील प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅमप्रमाणे हा पुरवठा होणार आहे. ग्राहकांना या नियंत्रित साखरेचा संपूर्ण कोटा मासिक परिमाणात घेता येणार आहे. यादरम्यान विक्र ीचा दर प्रतिकिलो १३.५० रुपये राहणार आहे. तसेच या साखरेची खरेदी किंमत प्रतिक्विंटल चार हजार ८८ असल्याचे येथील उपनियंत्रक शिधावाटप कार्यालयाने सांगितले आहे.या साखरेचा भिवंडीच्या शासकीय गोदामात साखरेचा पुरवठा केल्यानंतर अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी साखरेची दोन दिवसांत उचल करून शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. (प्रतिनिधी)