शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेवर प्रशासक का नेमू नये?

By admin | Updated: January 13, 2017 07:02 IST

कोट्यवधी रुपयांचा जकात कर चुकवणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर

मुंबई : कोट्यवधी रुपयांचा जकात कर चुकवणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना मोकळीक देणाऱ्या ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. कर चुकवणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली किंवा काय कारवाई करण्यात येणार आहे, यासंदर्भात ठाणे महापालिकेला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तर ठाणे महापालिकेवर प्रशासक नेमण्याबाबत राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.२०११ ते २०१४ या काळात वाइन शॉप, रेस्टॉरंट आणि बार, हॉटेल्स आणि सोनारांनी तब्बल ६०० कोटी रुपयांचा जकात कर चुकविल्याची माहिती ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते विनोद तावडे यांना माहितीच्या अधिकाराखाली मिळाली. हा कर चुकविणाऱ्यांकडून कोणतीच वसुली करण्यात आली नाही. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सरकार व ठाणे महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी विनोद तावडे यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. महापालिकेने मूळ रक्कम वसूल केली आहे. संबंधितांवर वेळेत कारवाई करण्यात न आल्याने महापालिका दंडाची रक्कम वसूल करू शकत नाही, अशी माहिती महापालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. ती रक्कम १५० कोटी असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. त्यावर ‘कारवाई करण्यास जाणूनबुजून विलंबही केला जाऊ शकतो. त्यामुळे कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई केलीत किंवा करणार आहात, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दोन आठवड्यांत द्या. त्याशिवाय सरकारने या महापालिकेवर प्रशासक नेमण्याबाबत त्यांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावे,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)