शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कर्जत नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:42 IST

आज होणार निवडणूक : धनंजय दुर्गे यांनी दिला राजीनामा

कर्जत : कर्जत नगरपरिषदेमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वीकृत नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उद्या दि.२७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडीत त्यांच्या जागी स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया २८ जानेवारी २०१९ रोजी पूर्ण झाली होती. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या सुवर्णा जोशी निवडून आल्या आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे अशोक ओसवाल यांची वर्णी लागली होती तर स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे संकेत भासे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धनंजय दुर्गे यांची वर्णी लागली होती.

जानेवारीमध्ये पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना -भाजपा-आरपीआय महायुतीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी विजयी झाल्या होत्या. महायुतीचे दहा नगरसेवक निवडून आले आहेत.  तर राष्ट्रवादी काँग्रेस मनसे-शिवराय भीमराय क्रांती संघटना महा आघाडीला आठ जागा मिळाल्या आहेत. दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली सत्ता मिळवण्यात महायुतीला यश आले.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. सत्तेत बसलेली महायुती मध्ये शिवसेना - भाजपा -आरपीआय हे तीन पक्ष आहेत. पहिले उपनगराध्यक्षपदाचा मान भाजपचे अशोक ओसवाल यांना मिळाला होता.

टॅग्स :thaneठाणे