शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

...कोणी अधिकारी देता का अधिकारी?

By admin | Updated: February 21, 2017 05:27 IST

शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागाकडे राज्य सरकारचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील

कल्याण : शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागाकडे राज्य सरकारचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील वर्ग-१ चे प्रशासन अधिकारी आणि वर्ग-२ चे शिक्षण अधिकारी ही पदे रिक्त असल्याने येथील केडीएमसीच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची उशिराने निघणारी सहल याचे ताजे उदाहरण असून अन्य प्रस्तावांनाही बसलेली खीळ पाहता कोणी अधिकारी देता का हो अधिकारी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर शिक्षण विभाग पूर्णपणे केडीएमसीच्या अखत्यारीत आलेला आहे. महापालिकेत नगरसेवक असलेल्यांची शिक्षण समितीवर सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. ही समिती स्थापन होऊन आता वर्षाचा कालावधी लोटायला आला असताना वर्षभरात केवळ दोनच सभा झाल्या आहेत. दुसरीकडे सरकारकडे भरण्यात येणारे प्रशासन अधिकारी आणि शिक्षण अधिकारी पद रिक्त आहे. सरकारकडून प्रशासन अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठवलेले सुरेश आवारी यांची ८ जून २०१६ ला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. आवारी यांच्यानंतर केडीएमसीचे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार सोपवला होता. परंतु, त्यांची प्रभाग अधिकारीपदी नेमणूक झाल्याने ते प्रभारी म्हणून एक महिनाच या पदावर राहिले. यानंतर, वर्ग-३ चे पद असलेले शिक्षण विस्तार अधिकारी जे.जे. तडवी यांना या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, प्रशासन अधिकारी या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. याची प्रचीती नुकत्याच झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत आली. दुसरीकडे वर्ग-२ चे शिक्षण अधिकारीपदही दोन वर्षे रिक्त आहे. सध्या भोंगळ कारभार पाहता सक्षम अधिकाऱ्यांची शिक्षण विभागाला आवश्यकता आहे. मात्र, याकडे होत असलेले सरकारचे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)