शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणी नेमके जाते कुठे?

By admin | Updated: November 17, 2016 07:20 IST

महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठया बाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

सदानंद नाईक / उल्हासनगरमहापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठया बाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. वाढीव पाणी जाते कुठे? कमी दाबाने पुरवठा का होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आयुक्तांनी मागितली आहेत. तसेच तोटयाविना असलेल्या निळया पाईपवर कारवाईचे संकेत दिले आहेत. ‘लोकमत’च्या सोमवारच्या अंकात ‘३०० कोटी खर्चूनही पाणी योजना कोरडी’ ही बातमी ‘आॅन द स्पॉट’ अंतर्गत सविस्तर प्रसिद्ध झाली. याची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. उल्हासनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा शहराला होऊनही नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मागील महिन्यात पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त निंबाळकर यांनी कॅम्प नं-५ कैलास कॉलनी या महापौर अपैक्षा पाटील यांच्या प्रभागात दौरा केला होता. त्यावेळी तोटयाविना असलेल्या निळया पाईपलाईप मधून लाखो लिटर पाणी गटारात जात असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले होते.आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी ते धाब्यावर बसविले. गेल्या १५ दिवसात एकावरही कारवाई झाली नसून याप्रकाराने विभागातील सावळागोधंळ उघड झाला आहे. तसेच ३०० कोटीच्या योजनेचे सुरवाती पासूनचे साक्षीदार असलेले कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांच्यावर कारवाई करून त्यांच्या हटावाच्या मागणीने जोर पकडला आहे. ७ लाखाच्या लोकसंख्येला १५५ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. आयुक्तांनी सेलवन यांच्यासह अभियंते व अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी बैठक घेऊन पाणी पुरवठयाचा आढावा घेतला. मात्र आयुक्तांचे अधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधन झाले नाही. पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बहुतांश कर्मचारी व अधिकारी मालमत्ता कर वसुलीच्या कामामध्ये जुंपले आहेत. असे असतांना करवसुलीचे श्रेय नागरी सुविधा केंद्र चालविणारा कंत्राटदार घेत आहे. करवसुली कार्यक्रमानंतर पाणीपुरवठा विभागावर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.शहरातील प्रत्येक चौकात कर भरणा केंद्र खाजगी कंत्राटदारामार्फत उभारून ती चालविण्यास दिली आहे. या केंद्रावर पालिका दरमहा ३० लाखापेक्षा अधिक खर्च करत असून ही लूट चालल्याचा आरोप होत आहे. असे केंद्र पालिका का चालवित नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी यांच्या चांगभल्यासाठी ही कर भरणा केंद्र उभारल्याची टीका विरोधकांनी केली आहे.