शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ती माणसे रांगेत आहेतच कुठे? त्यांची बँक खाती नाहीत का?

By admin | Updated: November 17, 2016 07:28 IST

ज्यांचा काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हा खटाटोप केला आहे, अशी माणसे मात्र रांगेत दिसत नसल्याने त्यांची बँकेत खाती नाहीत का, अशी चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.

भातसानगर : पाचशे हजार रु पयांच्या नोटा बदलण्यासाठी शहापुरात गेल्या अनेक दिवसांपासून तासन्तास सर्वसामान्य माणसे उभी असल्याचे दिसत आहे. मात्र, ज्यांचा काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने हा खटाटोप केला आहे, अशी माणसे मात्र रांगेत दिसत नसल्याने त्यांची बँकेत खाती नाहीत का, अशी चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.हजार, पाचशे रु पयांच्या नोटा रद्द करण्याच्या धोरणानंतर त्या बदलण्यासाठी शहापूर तालुक्यातील सर्वच बँकांमध्ये सकाळी साडेसहापासूनच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता या रांगेत तासन्तास उभी राहत असल्याचे दिसत असून या रांगेत मात्र मोठे राजकीय पदाधिकारी, धनदांडगे, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी दिसत नाही. त्यामुळे यांची बँक खाती नाहीत का? की, त्यांच्या नावावर पैसेच नाहीत. मग, आहेत तर ती कुठे आहेत, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. काहींचे नातेवाईकच बँकांमध्ये नोकरीला असल्याने अनेकांनी रांगेत उभे न राहता आपापले पैसे बदलून, तर काही काळ्याचे गोरे करून घेतल्याची चर्चा आहे. मग, पैसे बदलण्यासाठी बँकेत कितीही पैसे भरायचे असतील वा काढायचे असतील, तर तीच व्यक्ती असल्याशियाय बँकेत पैसे दिले जात नाहीत. असे असतानाही मग ही माणसे रांगेत नसतानाही त्यांचे पैसे बदलून कसे दिले जातात, असा प्रश्न निर्माण होत आहे. हा त्रास केवळ सर्वसामान्यांनाच होत असल्याने बँक कर्मचारी व रक्कम स्वीकारण्यास येणाऱ्यांत वाद होत आहेत. (वार्ताहर)