शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘जागो ग्राहक जागो’ कधी होणार?

By admin | Updated: December 24, 2015 01:41 IST

ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही,

भाग्यश्री प्रधान,  ठाणे ठाणे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन तब्बल २४ वर्षे उलटली असतानाही ग्राहक राजा झोपेतून जागा होण्याचे नाव घेत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे. २०१५ या वर्षात ११५२ ग्राहकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. त्यापैकी ९५० तक्रारींमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा न्याय मिळाला. मात्र एकूण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण बरेच नगण्य असल्याने जागो ग्राहक जागो हे ठाणेकरांच्या कधी काना-मनात शिरणार, असा सवाल ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत.ठाणे ग्राहक तक्रार निवारण मंचाची १९९१ मध्ये स्थापना करण्यात आली. गेल्या २४ वर्षांत त्यांच्याकडे १५ हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यामधील बहुतांश तक्रारदारांना दिलासा लाभला. गतवर्षीच्या तक्रारींच्या तुलनेत २०१५ या वर्षभरात नोंदवलेल्या व सोडवलेल्या तक्रारी तुलनेने कमी आहेत. सध्या बिस्कीटाच्या पुड्यात कमी वजनाची बिस्कीटे भरून ग्राहकांची दिशाभूल करण्यापासून महागडे फ्लॅट विकतांना घर खरेदीदाराला गंडवण्यापर्यंत अनेक प्रकार आजूबाजूला घडतात. मात्र तरीही फसवणूक झालेले ग्राहक त्याविरुद्ध दाद मागत नाहीत. ज्याने फसवणूक केली त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणे, फसवणूक करणारा प्रभावशाली व्यावसायिक, उद्योजक अथवा बिल्डर असेल तर त्याच्या विरोधात संघटीतपणे तक्रार करून लढा देणे असे प्रकार करण्यास ग्राहक धजावत नाही. बरेचदा दुर्लक्ष करणे किंवा जे पदरात पडेल ते स्वीकारणे अशी बोटचेपी भूमिका ग्राहक घेतो. त्यामुळे ग्राहकांना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जास्तीत जास्त तक्रारी पोहचाव्या, असे आवाहन गुरुवार २४ डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त करण्यात येत आहे. ग्राहकांच्या हितरक्षणाकरिता १९८६ सालापासून राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो. एखादी कंपनी जर मालाचा उत्तम दर्जा न राखता, केवळ आकर्षक मार्केटींग करून पुरवठा करीत असेल तर त्याची खरेदी ग्राहकांनी करु नये. तसेच अशा फसवणुकीविरुद्ध तक्रार दाखल करावी हाच ग्राहक दिन साजरा करण्यामागील हेतू आहे. ग्राहकाकडून पैसे घेऊन काहीवेळा दुकानदार फरार होतात किंवा ग्राहकाची फसवणूक करुन त्याच्याकडून जास्त पैसे उकळले, असे जाणवले तरीही ग्राहक तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांनी सर्व पुराव्यानिशी तक्रार निवारण न्यायालयात हजर राहणे मात्र गरजेचे असते. मात्र अनेकजण तक्रार नोंदवूनही सुनावणीच्यावेळी न्यायलयात हजर राहत नाहीत. अशा प्रकरणात तक्रारीत सकृतदर्शनी कितीही तथ्य आढळले तरी तक्रारीचा निकाल देणे कठीण जाते, असे ग्राहक मंचातर्फे सांगण्यात आले.