शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म कधी पूर्ण होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : एकीकडे अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम बदलापूरच्या नंतर सुरू होऊन पूर्णही झाले, तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बदलापूर : एकीकडे अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम बदलापूरच्या नंतर सुरू होऊन पूर्णही झाले, तरी बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे काम मात्र अजूनही अर्धवट अवस्थेतच रखडून पडले आहे. या सगळ्याला राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप बदलापूरवासीय करीत आहेत.

बदलापूर शहराला होम प्लॅटफॉर्म मिळावा, या हेतूने बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात होम प्लॅटफॉर्मचे काम मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम मागील अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडून पडले आहे. या प्लॅटफॉर्मसाठी जी जागा लागणार होती, तिचं अधिग्रहण न करताच प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरुवात झाली. मात्र या सगळ्यात कामाचा महत्त्वाचा वेळ निघून गेला आणि हे काम रखडून पडले. या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वारस्य दाखवून हस्तक्षेप केला असता, तर हे काम कधीच पूर्ण झाले असते. एकीकडे अंबरनाथ रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम बदलापूरच्या मागून सुरू होऊन पूर्णत्वास आले आहे, तर दुसरीकडे बदलापूरचे काम अर्धवट अवस्थेत रखडून पडले.

या सगळ्याबाबत खासदार कपिल पाटील यांना विचारले असता, प्लॅटफॉर्मसाठी लागणाऱ्या जागेचे हस्तांतरण बाकी असल्याने हे काम रखडल्याचे त्यांनी मान्य केले.

कुठलेही मोठे विकासकाम अशा पद्धतीने रखडत असेल आणि तो गुंता प्रशासकीय पातळीवर सुटत नसेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यात मध्यस्थी करून ते काम मार्गी लावणे गरजेचे असते; मात्र त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती बदलापूरच्या लोकप्रतिनिधींमध्ये दिसत नाही, अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

------------------------------------------