शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदाची निवडणूक कधी?

By admin | Updated: March 9, 2017 02:59 IST

महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. ८ फेब्रुवारीला ही निवडणूक

कल्याण : महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापपर्यंत सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. ८ फेब्रुवारीला ही निवडणूक होणार होती. परंतु, कोणतेही ठोस कारण न देता ती रद्द करण्यात आली. पीठासीन अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी अजूनही निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना वेळ मिळणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. महिला-बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. समितीतील सदस्यांचा कालावधी २९ डिसेंबरला संपुष्टात आला. तत्पूर्वी समितीवर नव्या सदस्यांच्या प्रमाणशीर प्रतिनिधीत्वानुसार नियुकत्या करण्यासाठी २६ डिसेंबरला विशेष महासभा बोलावण्यात आली होती. यात नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, शीतल मंढारी, उर्मिला गोसावी, वैशाली भोईर (सर्व शिवसेना आघाडी गट),वैशाली पाटील, रेखा चौधरी, इंदिरा तरे, वृषाली पाटील-जोशी (सर्व भाजपा-कल्याण डोंबिवली विकास आघाडी) तर काँग्रेसच्या हर्षदा भोईर या नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. मात्र, मनसेने गटनेते पदाच्या वैधानिक दर्जाच्या वादावर त्यांचा सदस्य समितीवर पाठवलेला नाही. त्यानंतर ८ फेब्रुवारीला सभापती पदाची निवडणूक जाहीर झाली होती.परंतु, सभापतीपदाचा यंदाचा टर्म भाजपाचा असताना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर युतीमध्ये उद्भवलेल्या वादात शिवसेनेकडून शीतल मंढारी तर भाजपाकडून वैशाली पाटील यांनी स्वंतत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. परंतु, निवडणुकीच्या एक दिवस आधी अपरिहार्य कारणास्तव निवडणुकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना पाठवण्यात आले. त्यानुसार ही निवडणुक रद्द करावी लागली.दरम्यान, सदस्य निवड होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला तरी निवडणुकीची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. याबाबत शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ठरला असताना तो असा अचानक स्थगित करता येतो का? कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला?, असे सवाल जाधव यांनी यापूर्वीच उपस्थित केले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक घेण्यासाठी वेळ मिळत नसेलतर त्यांनी आयएएस असलेल्या आयुक्त ई. रवींद्रन यांना पिठासीन अधिकारी म्हणून नेमावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)