शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळा बंद कधी?

By admin | Updated: August 6, 2015 23:35 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाने ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची कसून चौकशी केली असता सुमारे

सुरेश लोखंडे ,ठाणेजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाने ठाणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची कसून चौकशी केली असता सुमारे ५८० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आढळले होते. याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षातदेखील सुमारे ३९० शाळा आढळल्या आहेत. परंतु, शासन आदेशानुसार त्या बंद करण्यात ठाणे जिल्हा परिषद व महापालिका अपयशी ठरले आहेत. शैक्षणिक क्षेत्रासह शिक्षक वेतनावर शासनाचा मोठ्याप्रमाणात खर्च होत आहे. या तुलनेत लाभार्थी विद्यार्थी संख्या कमी आढळल्यामुळे राज्य शासनाने सुमारे एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनुदानित शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येचे सर्वेक्षण केले होते. कोणाचे हितसंबंध राखण्यासाठी ही हलगर्जी होते आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १७०० शाळा शिल्लक राहिल्या असता त्यातील सुमारे ३१६ शाळा बंद होण्यास पात्र ठरल्या होत्या. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी, दुर्गम भागात सुमारे १८५५ शाळा आहेत. यापैकी २६४ शाळांची पटसंख्या कमी असल्याचे आढळून आले आहेत. बहुतांशी आदिवासी कुटुंबे पाल्यासह गावपाडे सोडून कामासाठी अन्यत्र स्थलांतर करतात. यामुळे शाळेत बहुधा विद्यार्थी नसतोच. यानुसार ठाणे, पालघर जिल्ह्यांत सुमारे ५८० शाळा कोणत्याही क्षणी कायमस्वरूपी बंद होण्याचे संकेत मागील एक वर्षापासून आहेत. मात्र, त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. ती कशामुळे हा प्रश्न आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातील ३९० शाळांवर कारवाईची टांगती तलवार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांतील शाळांचा यात समावेश आहे. तर पालघरच्या जव्हार, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यांच्या शाळा बंद करण्यास पात्र ठरल्या आहेत. काही खाजगी शाळांवर कारवाई केली असता ठाणे जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे १७० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्यात आलेले आहेत.