शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

यादीत नावे शोधताना झाली दमछाक

By admin | Updated: February 22, 2017 06:11 IST

महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाचा अभाव मंगळवारी प्रकर्षाने जाणवला

ठाणे : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाचा अभाव मंगळवारी प्रकर्षाने जाणवला. मतदार यादीत नाव शोधण्यात बहुतांश मतदारांचे श्रम आणि वेळेचा नाहक अपव्यय झाला. परिणामी संतापलेल्या मतदारांच्या रोषाचा सामना मतदान केंद्रांवरील निवडणूक कर्मचाऱ्यांना करावा लागला.ठाण्यातील ब्रम्हांड, वसंत विहार, लोकपुरम, हिरानंदानी इस्टेट यासारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सकाळी पहिल्या एक तासात मतदानाचे प्रमाण कमी होते. हळुहळू ते वाढत गेले. मतदार यादीतील घोळामुळे या भागातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गैरसोय झाली. महापालिकेने आॅनलाईन प्रसिद्ध केलेली मतदार यादी आणि केंद्रांवर लावलेल्या यादीत तफावत आढळली. यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी घेऊन मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र या समस्येचे समाधान ते करु शकले नाहीत. त्यामुळे वादविवादाचे प्रकारही घडले. मतदान केंद्रांजवळ मतदार स्लीप वाटण्यासाठी उमेदवारांनी उभारलेल्या बुथवरील कार्यकर्त्यांची मदत मतदारांना नाईलाजास्तव घ्यावी लागली. काही ठिकाणी मतदार स्लीप आणि केंद्रांवरील मतदार यादीतही तफावत आढळली. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदानासाठी ४ ते ५ खोल्यांची व्यवस्था होती. मतदानाची खोली शोधण्यातही मतदारांना वेळ खर्ची घालावा लागला. मतदानाबाबत मतदारांमध्ये उत्साह होता. परंतु, प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनाअभावी त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. (प्रतिनिधी)उमेदवारांच्या चिन्हांवर शाईमतदान यंत्रांवर उमेदवारांच्या चिन्हांवर बोटाची शाई लावून चिन्हे काळी करण्याचे प्रकार काही मतदार जाणीवपूर्वक करीत असल्याची कुजबुज काही मतदान केंद्रांवर होती. त्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अधून-मधून मतदान यंत्रांची पाहणी करताना आढळले.