शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी ‘तो’ अहवाल पाठवणार कधी?

By admin | Updated: May 22, 2017 01:55 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या मानसिक छळवणुकीचा प्रकार समोर आला होता. या संदर्भातील तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अ

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या मानसिक छळवणुकीचा प्रकार समोर आला होता. या संदर्भातील तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने मागितलेल्या चौकशी अहवालाकडे केडीएमसीचे मात्र पुरते दुर्लक्ष झाले आहे. जानेवारीत दिलेल्या आदेशात १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना महापालिकेला करण्यात आल्या होत्या. परंतु, अद्यापपर्यंत अहवाल दिला गेलेला नाही. १९९८ मध्ये घडलेल्या जकात पावती फेरफार प्रकरणात मानसिक छळ करून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप विनायक लक्ष्मण गोडे या कर्मचाऱ्याने केला आहे. जकात विभागाचे तत्कालीन उपायुक्त रामनाथ सोनवणे, विनय कुलकर्णी, शांतीलाल राठोड, सच्चिदानंद कुलकर्णी, अनिल लाड, सुनील बागुल यांच्याविरोधात त्यांनी महापालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांकडेही तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे धाव घेतली. यात आयोगाने चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जानेवारीत दिले. २७ जानेवारीला आदिवासी विकास मंत्रालयानेही केडीएमसीकडून अहवाल मागितला.असे घडले प्रकरणगोडे हे जकात विभागात लिपिक असताना पावत्यांमध्ये झालेल्या फेरफार प्रकणात त्यांच्यावर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तत्कालीन जकात दक्षता पथकातील अधिकारी विनय कुलकर्णी, शांतीलाल राठोड व सच्चिदानंद कुलकर्णी यांनी तसा अहवाल सोनवणे यांना दिला. या अहवालावरून लिपिक गोडे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यासह ज्यांच्या पावत्यांमध्ये फेरफार दिसून आला त्या वाहतुकदाराविरोधात गुन्हा दाखल केला गेला. यात गोडे यांच्यावर फौजदारी कारवाई होऊन त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडीही भोगावी लागली. मात्र, या प्रकरणात केवळ अनुसूचित जाती-जमातीचा असल्याने आपल्याला नाहक गुंतवल्याचा व मानसिक त्रास दिल्याचा त्यांचा आरोप आहे. अन्य कर्मचाऱ्यांच्या पावत्यांमध्येही फेरफार झाला असताना त्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, कारवाई झाली नाही, याकडे गोडे यांनी लक्ष वेधले आहे. त्यातच चौकशी अधिकारी अनिल लाड यांनी त्यांचा चौकशीचा अहवाल प्रशासनाला सादर केला नाही. त्यात आयुक्तांची मंजुरी न घेता चौकशी अधिकारी असलेल्या माधव पटवर्धन यांच्याकडे दुसऱ्यांदा नव्याने चौकशी लावण्यात आली. त्यांच्या चौकशीत निर्दाेष सिद्ध झालो असतानाही प्रशासनाने याची योग्य ती दखल घेतली नाही, असे गोडे म्हणाले.