शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्ता सुस्थितीत येणार कधी?; पावसाळ्यात अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:12 IST

कल्याणहून डोंबिवलीला तसेच डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी नजीकचा पर्याय म्हणून रेल्वे समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

डोंबिवली : पावसाळा कधीही सुरू होईल, अशी परिस्थिती असताना चार महिन्यांपूर्वी ड्रेनेजलाइन टाकण्याकामी खोदलेल्या कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. सध्या सुस्थितीत नसलेल्या रस्त्यावरून वाहने चालवणे जिकिरीचे बनले असताना पावसाळ्यात खड्डे पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याणहून डोंबिवलीला तसेच डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी नजीकचा पर्याय म्हणून रेल्वे समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कल्याण-शीळ मार्गावरची वाहतूककोंडी तसेच इंधनाचा होत असलेला अपव्यय पाहता केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. आजघडीला या रस्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुस्थितीतील समांतर रस्त्याला वाहनचालकांची पसंती मिळत असताना दुसरीकडे या रस्त्यावरील ठाकुर्ली रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर जानेवारीमध्ये अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. तेथील गृहसंकुलांना ड्रेनेजव्यवस्थेशी जोडण्याचे काम केडीएमसीच्या वतीने हाती घेण्यात आले होते. ड्रेनेजसाठी खोदकाम करायचे होते, तर ते आधी करणे आवश्यक होते.सुस्थितीत, चांगला रस्ता त्या कामासाठी खोदण्यात आला. चार महिने हे काम सुरू होते, पण काही गृहसंकुलांपुरतेच ते मर्यादित राहिले. जो रस्ता म्हसोबा चौकातून खंबाळपाडा येथे जातो, त्या रस्त्यावरही एका बाजूकडील मार्गावर ड्रेनेजलाइन टाकण्यात आली. हे काम सुरू होते, तेव्हा कोणतीही सूचना अथवा कामाच्या माहितीचा फलक लावला नव्हता. त्यामुळे नेमका कोणत्या कामासाठी रस्ता खोदला गेला आहे, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम होता.

खड्ड्यांच्या ठिकाणी केवळ मातीचा भरावकाम आता पूर्ण झाले असले, तरी त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी मातीचा भराव टाकून त्यावर खडी टाकण्यात आली आहे. डांबर न टाकल्याने अर्ध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर टाकलेली खडी बाहेर पडून इतरत्र विखुरली आहे. पावसाळ्याआधी हा रस्ता सुस्थितीत येईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, पावसाळा तोंडावर आला तरी केडीएमसीला येथे डांबरीकरणासाठी मुहूर्त मिळालेला नाही. पावसाळ्यात खड्डेमय आणि चिखलमय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.