शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दहा नगरसेवकांवरील कारवाईचे काय?

By admin | Updated: December 25, 2015 02:16 IST

येथील एमआयडीसी परिसरातील एका अनधिकृत इमारतीवर मंगळवारी कारवाई होत असताना त्यामध्ये अडथळा आणल्याकरिता भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली

अनिकेत घमंडी, डोंबिवलीयेथील एमआयडीसी परिसरातील एका अनधिकृत इमारतीवर मंगळवारी कारवाई होत असताना त्यामध्ये अडथळा आणल्याकरिता भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या काळात १० नगरसेवकांवर अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याबद्दल कारवाईची टांगती तलवार होती. आता भाजपाच्या पाटील यांच्यासह त्या यादीतील आजी-माजी नगरसेवकांवर कधी कारवाई होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला वेग येत असेल तर ती अत्यंत चांगली बाब असून त्याचे निश्चितच स्वागत आहे. परंतु कारवाईत अपारदर्शकता व भेदाभेदाला स्थान असता कामा नये, असे लोकांचे म्हणणे आहे. निवडणूक काळात महापालिका आयुक्तांकडे अनधिकृत बांधकाम करणारे, त्याला संरक्षण देणारे, कारवाईच्यावेळी विरोध करणारे अशा ४८ जणांची यादी असल्याची चर्चा होती. त्यापैकी १० जणांना प्रशासनाने नोटीस काढली. काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक सचिन पोटे यांच्यावर कारवाई झाल्याने यंदा त्यांना निवडणूक लढवता आली नाही. त्यात सत्ताधारी शिवसेनेसह, मनसे, काँग्रेस आदी पक्षांच्या नगरसेवकांची नावे होती. निवडणूक झाल्यावर अचानक ही कारवाई कशी थंड झाली? केवळ राज्यातील सत्ताधारी भाजपाला खूष करण्याकरिता निवडणूक काळात प्रशासन या कारवाईची टांगती तलवार विरोधकांवर ठेवून होते का, असा सवाल केला जात आहे. प्रशासन पक्षपाती नसेल तर त्यांनी तात्काळ सर्व संबंधितांवर कारवाई सुरु करावी, अशी नागरिकांची भावना आहे. आयुक्तांच्या तथाकथित यादीने धास्तावलेल्या डोंबिवलीतील एका मनसेच्या लोकप्रतिनिधीने आयुक्तांकडून क्लीनचीट मिळवण्यासाठी फिल्डींगही लावल्याची चर्चा होती, त्यामुळे हा नगरसेवकांचे नाक दाबून तोंड उघडण्याचा आयुक्तांचा प्रयत्न होता का, असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे. म्हात्रे नगर परिसरातील एका चाळीतील १० घरांमधील रहिवाश्यांना घरे रिकामी करण्याची नोटीस विभाग अधिकाऱ्याने दिली. गेली १५ वर्षे त्याच चाळीत वास्तव्य केल्यानंतर ती अनधिकृत असल्याचा साक्षात्कार महापालिकेला कसा झाला, असा सवाल स्थानिक नगरसेवकाने केल्यावर महापालिका अधिकारी निरुत्तर झाले. चाळीत वास्तव्याला असणाऱ्या रहिवाशांकडे जमिनीची कागदपत्रे अथवा अन्य तांत्रिक बाबी कशा असतील. मात्र संबंधित अधिकारी त्याची मागणी करत होते. त्यामुळे महापालिकेची कारवाई ही ठराविक बांधकाम व व्यक्तींवर होत असल्याचे नगरसेवकांचे मत आहे.