शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यापोटी पुन्हा कल्याणला दंड?

By admin | Updated: December 22, 2015 00:18 IST

कल्याण-डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रिया न करताच उल्हास नदीत आणि खाडीत सोडले जात असल्याने एकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने बँक गॅरंटीची रक्कम वाढवली

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रिया न करताच उल्हास नदीत आणि खाडीत सोडले जात असल्याने एकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने बँक गॅरंटीची रक्कम वाढवली असतानाच राष्ट्रीय हरीत लवादानेही पालिकेला दंड ठोठावला आहे. तो विषय मार्गी लागण्याअगोदरच मलवाहिन्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे जोडण्याचे कामही नव्याने तीन महिने लांबणीवर पडले आहे. तसे झाल्यास पालिकेवर पुन्हा दंड भरण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. सध्या २१६ दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी अवघ्या ७३ दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रक्रिया करते. उरलेले तसेच नाले-गटारांवाटे कल्याण खाडीला जाऊन मिळते. असे पाणी थेट खाडीत सोडत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेकडून बँक गॅरंटी भरुन घेते.प्रक्रिया करण्यास जितका उशीर होतोत्या प्रमाणात बँक गॅरंटीची रक्कम वाढते. त्यातच उल्हास नदी, कल्याण खाडीच्या प्रदूषणास जबाबदार असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला राष्ट्रीय हरीत लवादानेही १५ कोटींचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाच आता प्रक्रिया केंद्रे जोडण्याचे काम तीन महिने लांबणीवर पडले आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या वाहिन्या आणि मल प्रक्रिया केंद्रे जोडून ती कार्यान्वित करण्याची अंतिम मुदत याच महिन्यात संपली. मात्र मोठागाव ठाकुर्ली येथील केंद्र वाहिनीशी जोडण्याचे काम प्रगतीपथावर हे काम मार्चपर्यंत लांबल्याचा दावा पालिका प्रशासने केला आहे.२७ गावांसाठी भुयारी गटार योजना तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प तयार करण्यात आला आहे. २७ गावांसाठी ४० दशलक्ष लिटर क्षमतेची, मोहने अटाळी आणि बल्याणी गावासाठी आठ दशलक्ष लिटर क्षमतेची मलनिस्सारण केंद्रे उभारण्याचे प्रस्ताव आहेत. हे प्रकल्प केंद्र सरकारकडून मंजूर झाल्यास सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता २२८ दशलक्ष लिटर होईल.