शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही थापा नाही वचन देतो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 03:15 IST

आम्ही थापा नाही, तर वचन देतो. मेट्रो प्रकल्पाची सुरूवात काँग्रेसने केली.

भार्इंदर : आम्ही थापा नाही, तर वचन देतो. मेट्रो प्रकल्पाची सुरूवात काँग्रेसने केली. पण ही मेट्रो मीरा-भार्इंदरमध्ये आणण्याचे काम शिवसेनेने केले. मुंबईत कमी झालेला मराठी टक्का मीरा-भार्इंदरमध्ये वाढला. पण हिंदी भाषक भवन आणून, इतर भाषकांचे लांगूलचालन करून कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना त्यांच्या तंगड्या तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.जे मुंबई-ठाण्यात केले, तेच मीरा-भार्इंदरमध्ये करा आणि मतदानानंतर येथे फक्त भगवा फडकवा, अन्य कोणतेही फडके नको, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेतील लोकांना सामावून घेत, त्यांच्यावर अन्याय न करता बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसैनिक हा भडक डोक्याचा आहे. पण तो जिवाला जीव देणारा आहे, असे कौतुकही त्यांनी केले.आम्ही मुंबईत पेंग्विन आणले. पण त्यावर टीका झाली. त्यातील एक पेंग्विन मरण पावला. पण देशातील मुलांनी पेंग्विन पाहायचेच नाहीत का, असा सवाल त्यांनी केला.काँग्रेस - राष्ट्रवादी हे आमचे वैचारिक दुश्मन आहेत. पण त्यांना सोडून ज्यांना निवडून दिले ते चांगले दिवस कधी आणणार असा सवाल ठाकरे यांनी केला.आमदार प्रताप सरनाईक यांनीही मेट्रो, पाणी हे शिवसेनेमुळेच मिळणार असल्याचा दावा केला.>मालमत्ता कर माफ : शिंदेपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर मीरा-भार्इंदरमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले. क्लस्टर आणि धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर शिवसेनेचे आमदार सभागृहात भांडले. त्यामुळे त्यांना पाच वेळा निलंबित व्हावे लागले, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नाही, तर लोकांशी आहे आणि शिवसेना फक्त निवडणुकीपुरते नाही, तर वर्षभर काम करते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.>वेडेवाकडे सेल्फी नकोत : सेल्फी काढण्याची क्रेझ तरूणांमध्ये असली तरी जीव धोक्यात घालून वेडेवाकडे सेल्फी काढू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले. मुंबईत अशी सेल्फी काढण्याच्या नादात बुडणाºया तरूणींना वाचवण्यास गेलेल्याच्या पाठिशी शेवटी शिवसैनिकच उभा राहिल्याचा दाखलाही त्यांनी दिला.