शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला स्वतंत्र नगरपालिका नको, २७ गावांमधील नगरसेवकांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:04 IST

२७ गावांमधील नगरसेवकांची भूमिका : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वगळण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत असले, तरी या २७ गावांतील नगरसेवकांना गावे महापालिकेतच हवी आहेत. स्वतंत्र नगरपालिकेला त्यांचा विरोध असून, तशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.१९८३ पासून ही गावे महापालिकेत होती. २००२ मध्ये ही गावे तत्कालीन आघाडी सरकारने वगळली. पुन्हा २०१५ मध्ये ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली.

या गावांतून सर्वच राजकीय पक्षांबरोबर अपक्ष नगरसेवकांनी निवडणूक लढवली. या गावांतील नगरसेवकांनी गावांच्या विकासासाठी विविध मागण्या महापालिकेकडे केल्या आहेत. महापालिकेत राहूनच या गावांचा विकास होईल, अशी त्यांची भावना आहे. कल्याण-मलंग रस्ता ४५ फुटांचा असून, त्यावर ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तसेच २७ गावांसाठी १९२ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. तिचे सध्या काम सुरू आहे. गावांचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. मात्र, त्यांचा सुनियोजित विकास झालेला नाही. यंदाच्या पावसळ्यात गावातील रस्ते वाहून गेले. महापालिका प्रशासनाने त्यासाठी ३२७ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र, त्याला सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही.दुसरीकडे, केडीएमसीतून गावे वगळण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती आग्रही आहे. या प्रश्नावर समितीने पाच वर्षे लढा दिला आहे. तसेच न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. गावे वगळण्यासंदर्भात सरकारकडून केवळ आश्वासन दिले गेले. मात्र, त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने २७ गावांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर गावांतील नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे. त्यांच्या मते स्वतंत्र नगरपालिका केल्यास या गावांचा विकास होणार नाही. महापालिकेतच राहून विकास केला जाऊ शकतो. नगरसेवकांनी गावे वगळण्याच्या मागणीला छेद देणारी मागणी केल्याने गावे वगळण्याच्या मुद्यावर दोन मतप्रवाह पुढे आले आहेत. गावे वगळण्यास विरोध करणारे नगरसेवक मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, विनोद काळण, कुणाल पाटील, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, रविना माळी, आशालता बाबर, पूजा म्हात्रे, रूपाली म्हात्रे, प्रमिला पाटील, इंदिरा तरे, सोनी अहिरे, ऊर्मिला गोसावी, विमल भोईर, सुनीता खंडागळे यांनी त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. त्यामुळे गावे वगळण्याच्या सरकारी बैठकीच्या वेळी या गटालाही सरकारला बोलवावे लागणार आहे.बिल्डरलॉबीचा दबावगावे वगळण्याच्या मुद्यावर बिल्डर लॉबी सक्रिय आहे. या लॉबीचा सरकारवर दबाव आहे. बड्या बिल्डरांना स्वतंत्र नगरपालिका हवी. कारण, त्यांच्याकडे महापालिकेची मालमत्ताकराची थकबाकी आहे. स्वतंत्र नगरपालिका कररचना कमी असेल, यासाठी बिल्डर गावे वगळण्याच्या मागणीला अप्रत्यक्षरीत्या जोर लावत आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका